Birthday Special: करीनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफ अली खानने पहिल्या पत्नीला पाठवलं होतं पत्र

करीना नाही तर या परदेशी मुलीसाठी सैफने अमृताशी केला काडीमोड  

Updated: Aug 16, 2021, 11:26 AM IST
Birthday Special: करीनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफ अली खानने पहिल्या पत्नीला पाठवलं होतं पत्र  title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. 10 वर्ष लहान असलेल्या सैफने जेव्हा अभिनेत्री करीना कपूर खानसोबत लग्न केलं. तेव्हा देखील त्यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती. करीनासोबत लग्न करण्यापूर्वी त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंहसोबत झालं. पण त्यांचं नातं फार जास्त काळ टिकलं नाही. अमृता आणि सैफमध्ये तब्बल 12 वर्षांचं अंतर होतं. करीनासोबत लग्न करण्याआधी सैफने पहिली पत्नी अमृता सिंगला एक पत्र पाठवलं होतं. 

 सैफ अली खान और उनकी पत्नी अमृता सिंह की उम्र में 12 साल का अंतर था. सैफ, अमृता से 12 साल छोटे थे. दोनों की पहली मुलाकात ये दिल्लगी के सेट पर हुई थी.

सैफ जेव्हा सारा अली खानसोबत करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. करीनासोबत लग्न करण्यापूर्वी अमृला पाठवलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने येणाऱ्या आयुष्याबद्दल शुभेच्छा मागितल्या आणि जीवनात पुढे जाण्यास सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे करीनामुळे सैफचं पहिलं लग्न मोडलं अशा चर्चा रंगल्या होत्या. 

पण फार कमी लोकांना माहिती आहे की करीनामुळे नाही  तर मॉडेल रोझा  कॅटलानोमुळे अमृता आणि सैफमध्ये दुरावा निर्माण झाला होता. अमृता आणि सैफच्या लग्नाला 10 वर्षा झाली आणि त्या दोघांमध्ये रोझाची एन्ट्री झाली. ही गोष्ट जेव्हा अमृता  कळाली, तेव्हा दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. नात्यात सतत येत असलेल्या अडचणींमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

पण रोझा आणि सैफचं नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही. सैफ आणि रोझाचं ब्रेकअप झालं. जेव्हा सैफ आणि अमृताचं घटस्फोट झालं तेव्हा रोझा देखील त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. आता सध्या रोझा कोठे आहे आणि काय करते याबद्दल काही माहिती नाही. त्यानंतर सैफच्या मनात करीनाने घर केलं आणि दोघांनी लग्न केलं.