बाळाच्या जन्माआधी भारतीचा मोठा निर्णय, पतीला याची कल्पनाही नव्हती...

कॉमेडी क्वीन भारती सिंग लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 

Updated: Feb 27, 2022, 06:43 PM IST
 बाळाच्या जन्माआधी भारतीचा मोठा निर्णय, पतीला याची कल्पनाही नव्हती... title=

मुंबई : नेहमीच आपल्या कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी कॉमेडी क्वीन भारती सिंग लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 

भारती एप्रिलमध्ये बाळाला जन्म देणार असल्याचं बोललं जात आहे. मुलाच्या जन्मासाठी दोघेही खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. भारतीने तिच्या बाळाच्या जन्मापूर्वी स्वागतासाठी विशेष तयारी सुरू केली आहे, ज्याची एक झलक तिने तिच्या यूट्यूब ब्लॉगवर चाहत्यांसह शेअर केली आहे.

भारती सिंगने तिच्या यूट्यूब चॅनल Life of Limbachiyaa मध्ये नवीन व्हिडिओत होणाऱ्या बाळाच्या गोंडस पाळणाघराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली. भारतीने पती हर्षच्या कामाच्या खोलीला पाळणाघर बनवलं आहे.. 

भारतीने बेबी रूमची कलर थीम बेबी पिंक आणि लाईट ब्लू ठेवली आहे, कारण भारती म्हणते की तिला अजून मुलगा कि मुलगी याबाबत माहित नाही, त्यामुळे तिने दोन्ही बाजूंचा विचार करुन रुम सजवला आहे.

बाळाच्या जन्माआधी ही सगळी तयारी करायचं हे भारतीने आधीच ठरवलं होतं. हर्षसाठी या गोष्टी एक सरप्राईज होतं. आता लवकरच ती बाळासाठीच्या या खास खोलीचं संपुर्म काम पुर्ण करणार आहे.