VIDEO आख्ख जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत, पण भाऊ मात्र त्या दुसऱ्याच लाटेचा आनंद लुटतोय...

आख्ख जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत आहे, मात्र अभिनेता भाऊ कदम याच्यासाठी दिवसभरातील ही त्याची झोपेची दुसरी लाट

Updated: Apr 6, 2021, 05:37 PM IST
VIDEO आख्ख जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत, पण भाऊ मात्र त्या दुसऱ्याच लाटेचा आनंद लुटतोय... title=

मुंबई : आख्ख जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंतेत आहे, मात्र अभिनेता भाऊ कदम याच्यासाठी दिवसभरातील ही त्याची झोपेची दुसरी लाट महत्त्वाची असते. भाऊ कदमची झोपेची पहिली लाट रात्री असते, नंतर चला हवा येऊ द्याच्या सेटवर ही दुसरी झोपेची लाट भाऊंना येते आणि भाऊ या लाटेचा असा आनंद लूटतात, हे पहिल्यांदाच कुशल बद्रिके याने सर्वांसमोर आणलं आहे. भाऊची ही झोपेची दुसरी लाट पाहून कोरोनातील रुग्णही बरे होवोत, हीच अपेक्षा. कारण भाऊ आणि चला हवा येऊ द्याच्या या शोच्या आनंदातही एक औषध आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal)

अभिनेता भाऊ कदम हे झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामार्फत अगदी घराघरात पोहोचले. भाऊ कदम यांच्या अभिनयासोबतच त्यांच्याबाबतच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना आवडतं असतं. भाऊ कदम यांना आपली झोप किती लोकप्रिय आहे. हे देखील अनेकदा त्यांचे सहकलाकार यांनी सांगितलं आहे. 

असाच एक भाऊ कदमचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडिओ अभिनेता कुशल बद्रिकेने तयार केला आहे. या व्हिडिओत भाऊ कदम आणि चला हवा येऊ द्याची टीमची तालिम सुरू आहे. असं असताना भाऊ कदम झोपल्याचा हा व्हिडिओ आहे. 

भाऊ कदम यांच पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा... असं म्हणतं कुशल बद्रिकेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत भाऊ कदम चक्क झोपताना दिसत आहेत. या व्हिडिओत भाऊ कदम चक्क झोपताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांना जाग आल्यावर ते आपण पाठांतर करत असल्याचं भासवत आहेत.