थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

Updated: Jun 8, 2017, 08:07 PM IST
थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली' title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

'बाहुबली' या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रम रचले. हा चित्रपट जेवढा लोकप्रिय ठरला त्यापेक्षाही जास्त चर्चिला गेला याचा पुढचा भाग असलेला 'बाहुबली २' हा चित्रपट... व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डोळे दिपवणारे साहसदृष्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये ठरली. अजूनही अनेक चित्रपटगृहात ‘बाहुबली २’ ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच आहे. 

'बाहुबली २'ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत 'भाऊबली' हा चित्रपट बनवला. ज्यात मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लाळदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे, तिचा पती बिजालदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. 

विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विनोदाचा जबरदस्त तडका. 

'बाहुबली २' सारख्या कल्पेनेपलिकडच्या चित्रपटाला आपल्या स्किटमध्ये उतरवणं ही कल्पनाही तेवढीच भन्नाट आहे. त्यामुळेच थुकरटवाडीकरांचा हा भाऊबली 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. येत्या सोमवारच्या भागात म्हणजे १२ जूनला रात्री ९.३० वाजता 'झी मराठी'वर हे खास स्किट बघायला मिळणार आहे.