टीबीशी झुंजणार्‍या पूजा डडवालला रवि किशनने केली मदत

सलमान खानसोबत 'वीरगती' या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीसोबत झुंजत आहे. 

Updated: Mar 21, 2018, 06:28 PM IST
टीबीशी झुंजणार्‍या पूजा डडवालला रवि किशनने केली मदत title=

मुंबई : सलमान खानसोबत 'वीरगती' या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीसोबत झुंजत आहे. सोबतच आर्थिक चणचण असल्याने उपचार घेणंदेखील कठीण झाल्याने सलमान खानकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. 

परिवारानेही पाठ फिरवली  

पूजाच्या आजारपणामुळे तिच्या परिवारातील लोकांनी पाठ फिरवली आहे. आता पूजाच्या मदतीला भोजपुरी स्टार रवि किशन आला आहे. हैदराबादमध्ये 'एमएलए' चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान त्याचा साथीदार पप्पू यादव याच्याकडे काही पैसे आणि फळं हॉस्पिटलमध्ये पाठवली आहेत.  मुंबईतील टीबी रुग्णालयामध्ये पूजावरउपचार सुरू आहेत. 

रवि किशनची मदत  

काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक विनय लाड यांच्या एका चित्रपटामध्ये पूजा आणि रवि किशनने एकत्र काम केले होते. पप्पू यादवने किती रूपयांची मदत केली या बाबत डिटेल्स दिलेले नाहीत. त्याच्या माहितीनुसार, रविकिशन अनेकदा अशाप्रकारे मद्त करत असतो.