Stree 2 Fliming Begins: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'स्त्री 2' या चित्रपटाची. 2018 साली आलेल्या स्त्री या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्यानंतर आता हा या चित्रपटाचा पुढील भाग येतो आहे. त्यामुळे आता या नव्या भागात प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळेल याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. स्त्री 2 चा पहिला लुक सध्या प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्याची धोषणा यावेळी करण्यात आली आहे. हॉरर आणि थोडासा कॉमेडी असा या चित्रपटाचा जॉनर होता तेव्हा यावेळी देखील आपल्याला असंच काहीच पाहायला मिळणार आहे की नाही? याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे.
पहिल्या चित्रपटातून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे दोघं समोर आले होते. त्यातून आता या चित्रपटातून कोणते नवे कलाकार समोर येतील याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तुम्हाला आठवत असेलच यावेळी या चित्रपटातून अभिषेक बनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांच्या कॉमेडीनं चार चांद लावले होते. अशी हॉरर कॉमेडी ही पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये आलेली होती त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. आज काही तासांपुर्वीच या चित्रपटाचा पहिला लुक आला आहे. ज्यातून आपल्याला थोडी भीतीही वाटते आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सिक्वेलच्या टीझरनं धुमाकूळ घातला आहे.
हेही वाचा - 'कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी गंगेत थुंकणं हे...'; Oh My God 2 च्या टीझरवरुन नवीन वाद
राजकुमार राव यानं सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची तूफान चर्चा रंगली आहे. 'पुन्हा एकदा चंदेरीमध्ये आतंक पसरला आहे. स्त्री 2 ची शुटिंग सुरू झाली आहे. ती येतेय, ऑगस्ट 2024 ला' त्यासोबत श्रद्धा कपूरही यावेळी चित्रपटातून लीड रोलमध्ये दिसणार आहे. कारण ती या याविषयची माहिती आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून दिली होती. सोबतच काही दिवसांपुर्वी ती एअरपोर्टवरही स्पॉट झाली होती. या चित्रपटाचे शुटिंग हे मध्यप्रदेशमध्ये सुरू आहे.
रावकुमार राव 'भीड' या त्याच्या चित्रपटानंतर दिसेल. तसेच याचवर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तू झूठी मैं मक्कर' या चित्रपटातून रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती.
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.