'Big Boss 15'साठी तयारी सुरू; सलमान खानकडून स्पष्टीकरण

यंदाचं Big Boss प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरलं आहे.  

Updated: Feb 22, 2021, 04:53 PM IST
'Big Boss 15'साठी तयारी सुरू; सलमान खानकडून स्पष्टीकरण

मुंबई : Big Boss 14 finale नंतर आता बिग बॉसच्या पुढच्या भागाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलं आहे. बिग बॉस प्रेक्षकांच्या आवडतीचा कार्यक्रम आहे. बिग बॉसचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. त्यामुळे बिग बॉसच्या अंतिम सोहळ्या सलमानने बिग बॉसच्या पुढील भागा संदर्भात स्पष्टीकरण दिलं. या वेळी स्पर्धकांचं Online Registration वूट ऍपच्या माध्यमाद्वारे करण्यात येणार आहे आणि यासाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. 

मात्र यंदा कार्यक्रम कशा प्रकारे असेल याचा खुलासा झालेला नाही. मात्र शो मेकर्स यंदा काही हटके करण्याच्या विचारात आहेत. त्याला कारण देखील तसचं आहे. बिग बॉस भरपूर टीआरपी मिळवणार शो आहे. परंतु बिग बॉस 14 या भागाने चाहत्यांचे हवे तसे मनोरंजन करू शकला नाही. त्यामुळे Big Boss 15 अत्यंत वेगळा असेल अशी शक्यता वर्तवण्यास हरकत नाही. 

दरम्यान,  सगळ्या स्पर्धकांवर मात करत रुबीना दिलेकने बिग बॉस 14 ची ट्रॉफी जिंकली आहे. 140 दिवस सुरू होता हा खेळ 3 ऑक्टोबर 2020 रोजी बिग बॉस 14 चा सिझन ऑनएअर गेला. खूप दिवसांपासून या शोची वाट पाहिली जात होती. हा कार्यक्रम एकूण 138 दिवस चालला.