मुंबई : 'बिग बॉस ११' हा रिअॅलिटी शो वेगवेगळ्या कारणांमूळे चर्चेत असतो. त्यामूळे टीआरपीच्या आकड्यांमध्येही हा शो नेहमी वरच असलेला पाहायला मिलता.
बिग बॉसच्या कालच्या भागात असे काही घडले की, ते याआधी कधीच पाहायला मिळाले नव्हते.
'बिग बॉस' च्या घरात हिंदी भाषेचा शब्द प्रयोग करावा यासाठी 'बिग बॉस' आग्रही असतात. पण असे न झाल्याने बिग बॉसच्या नाराजीलाही सामोरे जावे लागते हे देखील दिसून आले. यासंबंधीचा व्हिडिओ समोर आला आहे.
बीबी पोल्ट्री टास्कच्या जवळ लव आणि हिना एकमेकांशी बोलत आहेत. त्यावेळी हिना हिंदी भाषेत न बोलता इंग्रजी भाषेत बोलत आहे.
यामूळे 'बिग बॉस' च्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यानंतर 'बिग बॉस' ने हिना आणि लवला मध्येच थांबवत, 'हिना केवळ हिंदीमध्येच बोला..' असे सांगितले.
पण हिनाने बिग बॉसकडे दुर्लक्ष करत, 'हा..व्हाटएवर..' असे म्हटले. त्यानंतर 'बिग बॉस तुम्हाला सांगत आहेत तर त्यावर अंमल करायला हवा ' असे हिनाला खडसावले.
त्यानंतर हिना आपला चेहरा लपवते आणि सॉरी बोलते.