मुंबई : टी व्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या अभिनयापासून दूर आहे. ती सध्या ब्रेक इन्जॉय करत आहे. एवढंच नाही ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. करिश्मा नव्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करणार असल्याचं देखील कळत आहे. करिश्मा तन्ना रियल स्टेट वरूण बंगेराला डेट करत आहे. शिवाय करिश्माने वरूणसोबत गुपचूप साखरपुडा केला असल्याचं देखील समजत आहे. वरूणने सोशल मीडियावर करिश्मासोबत एक फोटो शेअर केला आहे.
तर करिश्माने केकचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर अभिनंदन लिहिलं आहे. या एका फोटोमुळे चर्चेला उधाण आलं आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची भेट एका कॉमन फ्रेंड सुवेद लोहियाच्या माध्यमातून झाली.
तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा त्यांच्या नात्याबद्दल गंभीर आहेत. दोघे लवकरच लग्न करू शकतात. यावर्षी ऑगस्टमध्ये करिश्मा तन्नाने तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी सर्व जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते.
दरम्यान, करिश्मा तन्नाने उपेन पटेलला डेट केले आहे. दोघेही 'बिग बॉस हाऊस'मध्ये भेटले होते. दोघांनी 'लव्ह स्कूल' हा रिअॅलिटी शोही होस्ट केला आहे. करिश्मा तन्ना आणि पर्ल वी पुरी एकमेकांना डेट करत होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघे चांगले मित्र आहेत.