Viral News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अशा घटना किंवा सत्य असतात जे फक्त त्याचा पूर्ती मर्यादा असतात. त्याच्याशिवाय हे सत्य कोणाला माहिती नव्हतं. पण कधी ना कधी हे सत्य जगासमोर येतं. अशीच एक घटना समोर आली आहे. IVF च्या मदतीने जोडप्याला जुळी मुली झाल्या. त्या कपलने डॉक्टरांचे कौतुक त्याने तोंड भरुन केलं. जुळ्या मुलींच्या जन्मामुळे त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. त्या जोडप्याने त्या दोघींना खूप प्रेमाने लहानचं मोठं केलं. पण अचानक एकेदिवशी त्या आनंदी कुटुंबात वादळ आलं. त्या जुळ्या मुलींपैकी एकेने वयाच्या 40 व्या वर्षी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीला त्याच्या वंशवृक्षाची (family tree) माहिती हवी होती. पण डीएनए चाचणीमध्ये असा खुलासा झाला की तिला धक्काच बसला.
द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियाचे रहिवासी जेन आणि जॉन रो यांचे लग्न बरंच दिवस झाले होते. पण मूल जन्माला आले नाही तेव्हा तिने 1983 मध्ये लॉस एंजेलिसचे आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. हॅल सी. डेंजर यांची मदत घेतली. डॉक्टरांनी IVF सुचवला. तीन वेळा प्रयत्न केला पण गर्भवती झाली नाही. यानंतर एक चमत्कार घडला. एप्रिल 1984 मध्ये महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, मुलं केवळ एक दिवसच वाचली. यानंतर दाम्पत्याच्या मुलाबाबतच्या आशा आणखी वाढल्या. या जोडप्याने पुन्हा आयव्हीएफ केले. भरपूर पैसा खर्च केला. यामुळे जेनही गरोदर राहिली आणि जून 1986 मध्ये तिने पुन्हा जुळ्या मुलींना जन्म दिला.
पण जानेवारी महिन्यात एका विधवा मुलीला तिच्या पूर्वजांची माहिती घ्यायची होती, म्हणून तिची डीएनए चाचणी झाली. पण निकाल पाहून मला धक्काच बसला. या चाचणीत असं आढळलं की तिचा डीएनए तिच्या आईशी जुळतो, पण त्यांच्या वडिलांशी तो जुळत नव्हता. याबाबत तिनेने आईला विचारले असता तिलाही आश्चर्य वाटलं. नंतर कळलं की डॉक्टरांनी दुसऱ्या पुरुषाच्या स्पर्मने IVF केले होते, मग त्याचा DNA कसा जुळला. यानंतर महिलेने डॉक्टरवर 'मेडिकल रेप'चा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची कॅलिफोर्निया न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
डीएनए चाचणीतून 16 भाऊ-बहीणही बाहेर आले आहेत. ही मुलगी एकटी नव्हती, तिला 16 भाऊ आणि बहिणीही होत्या. नोंदीनुसार या सर्व मुलांमध्ये एकाच वडिलांचा डीएनए आढळून आलाय. असे दिसते की प्रत्येकाच्या पालकांनी आयव्हीएफचा अवलंब केला आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर युक्त्या खेळल्या. मुलींनी या मुलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. सर्वांचा जन्म 1971 ते 1992 दरम्यान लॉस एंजेलिसमध्ये झाल्याचे उघड झाले असून सर्व आयव्हीएफ उपचार डॉ. डेंजर यांनी केलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या परवानगीशिवाय दुसऱ्याचे शुक्राणू वापरणे हे वैद्यकीय बलात्काराच्या श्रेणीत येते. ही एक अशी घटना आहे ज्यातून कुटुंब कधीही सावरू शकत नाही.