मनी लॉन्ड्रींग प्रकरणी जॅकलिनला जामीन (jacqueline get bail) मंजूर झाला आहे. पतियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला दिलासा दिलायं.
200 कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचं ( Jacqueline Fernandez ) नाव पुढे आलं आहे. त्यामुळे जॅकलिनवर अटकेची टांगती तलवार होती. महाठग सुकेश चंद्रशेखरसोबतची जवळीक जॅकलिनला भोवली आहे. ईडीकडून ( Enforcement Directorate ) त्रास होत असल्याचा जॅकलिनने आरोप केला होता. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) जामिनावरील सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. यावेळी तिने ईडीवर काही आरोप देखील केले. आपल्यावरील आरोप तथ्यहिन असल्याचं तिने म्हटलं आहे.
#WATCH | Actor Jacqueline Fernandez reaches Delhi's Patiala House Court.
The Court will pronounce an order today on her bail plea in Rs 200 crores money laundering case. pic.twitter.com/ESMPQggJ4g
— ANI (@ANI) November 15, 2022