'वास्तव' फेम जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन...सिनेसृष्टीवर शोककळा

त्यांना अचानक चक्कर आली आणि ते  खाली कोसळले  आणि अंतर्गत रक्तस्त्राव होऊन रात्री सुमारे १ च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Nov 14, 2022, 01:35 PM IST
'वास्तव' फेम जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन...सिनेसृष्टीवर शोककळा  title=

BIG NEWS : मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे, काळ रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीतसः अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या. ते ७५ वर्षांचे होते. सरफरोश ,गांधी आणि वास्तव सारख्या सिनेमांमधून त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती . 

त्यांना अचानक चक्कर आली आणि ते  खाली कोसळले  आणि अंतर्गत रक्तस्त्राव होऊन रात्री सुमारे १ च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

एक हरहुन्नरी कलाकार मम्हणून त्यांची ओळख होती. आज दुपारी त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.