बिग बॉस ११ : बाहेर पडलेल्या सपनाला बॉलिवूडमधून ऑफर

बिग बॉसच्या अकराव्या सिझनमधून नुकतीच बाहेर पडलेली सपना चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 27, 2017, 08:29 PM IST
बिग बॉस ११ : बाहेर पडलेल्या सपनाला बॉलिवूडमधून ऑफर  title=

मुंबई : बिग बॉसच्या अकराव्या सिझनमधून नुकतीच बाहेर पडलेली सपना चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि 

त्याला कारण देखील तसंच काहीसं आहे. बॉलिवूडचा मोठा कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक असलेल्या या व्यक्तीकडून सपनाला ऑफर देण्यात आली आहे. सर्वांचाच लाडका असलेल्या रेमो डिसूजाने सपनाला बॉलिवूडमध्ये डान्स करण्याची मोठी ऑफर दिली आहे. 

मागच्या एपिसोडमध्ये  रेमो व जॅकलिन फर्नांडिस हे दोघे ‘रेस3’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस ११’च्या घरात पोहोचले होते. यादरम्यान घरातील स्पर्धकांना काही टास्कही करायचे होते. डान्सची वेळ आल्यावर सगळ्यांनीच सपनाचे नाव घेतले. सपनाने रेमोच्याच ‘अ फ्लार्इंग जट्ट’च्या ‘बिट पे बुटी’ या लोकप्रीय गाण्यावर डान्स केला. सपनाचा डान्स पाहून रेमो इतका प्रभावित झाला की, त्याने लगेच तिला ऑफर देऊन टाकली. तू इतकी चांगली डान्सर आहेस तर तुझ्यासोबत काम करणे तर बनतेच, असे रेमो सपनाला म्हणाला. 

बिग बॉस ११ च्या इतर स्पर्धकांबरोबरच सपनाला देखील हा गोड धक्का होता. आता सपना बिग बॉसमधून बाहेर पडली असली तरीही बॉलिवूड तिला खुणावत आहे. सपना ‘लव्ह बाईट’ या गाण्याद्वारे अलीकडेच बॉलिवूड डेब्यू केला आहे. गेल्या महिन्यातचं तिचे हे गाणे रिलीज झाले. आता लवकरच सपनाला एक मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते खुष आहेत.