Miss World मानुषी छिल्लर या अभिनेत्याची आहे दिवानी

भारताला १६ वर्षानंतर मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड हा किताब मिळवला आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 27, 2017, 07:33 PM IST
Miss World मानुषी छिल्लर या अभिनेत्याची आहे दिवानी

नवी दिल्ली : भारताला १६ वर्षानंतर मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड हा किताब मिळवला आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला. 

भारतात येताच मानुषी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सोमवारी तिने बाप्पाच्या दर्शनानंतर मीडियाशी संवाद साधला. तेव्हा तिने सांगितलं की, मानुषी बॉलिवूडचा परफेक्सनिस्ट म्हणजे आमीर खानची चाहती असून तिला त्याच्यासोबत काम करायचं आहे. आणि जेव्हा तिला तिच्या फेवरेट अभिनेत्रीबाबत विचारलं तेव्हा तिने क्षणाचा ही विलंब न करता मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राचा नावाचा उल्लेख केला. 

काय म्हणाली मानुषी? 

सोमवारी प्रभादेवीला मीडियाने मानुषीशी संवाद साधला. मिस वर्ल्ड झाल्यावर मानुषी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार यात काही शंका नाही. तसेच तिने उत्तम स्क्रिप्ट मिळाली तर सिनेमा करणार असं वक्तव्य करून दुजोरा देखील दिला आहे. त्यामुळे तिला फेव्हरेट अभिनेत्याबद्दल विचारल्यास ती म्हणाली की, सगळे अभिनेते उत्तम आणि टॅलेंडेट आहेत. मात्र माझ्या चॉईसबद्दल विचाराल तर मला आमीर खान प्रचंड आवडतो. मला कायम वाटतं की त्यांच्याजवळ भरपूर चॅलेंजिंग रोल असतात. तसेच ते सिनेमांत दमदार संदेश देत असतात. 

तसेच मानुषी म्हणाली की, मला आनंद आहे की मी स्वचःतेच्या विषयाशी जोडलेली आहे. तसेच जगभरातील मिस वर्ल्ड इतर सहयोगी देखील माझ्याशी जोडलेल्या आहेत. मी या सगळ्या प्रोजेक्टना घेऊन आनंदी आहे.