प्रतीक्षा संपली! लयभारी म्हणत बिग बॉस मरठीमध्ये रितेशभाऊंची एन्ट्री

बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर मोठ्या थाटात पार पडला आहे. लयभारी होस्ट म्हणून रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली आहे. पाहा संपूर्ण अपडेट. 

Soneshvar Patil & सोनेश्वर पाटील | Updated: Jul 28, 2024, 12:27 PM IST
 प्रतीक्षा संपली! लयभारी म्हणत बिग बॉस मरठीमध्ये रितेशभाऊंची एन्ट्री title=

Bigg Boss Marathi : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 ला सुरुवात होणार आहे. मी रितेश विलासराव देशमुख असं म्हणत लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या सीझन 5 शोमध्ये होस्ट म्हणून ग्रँड एन्ट्री घेतली आहे. आज रात्री 9 वाजता या सीझनचा प्रीमियर थाटात पार पडणार आहे. 

या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना कोण-कोणते नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार हे ग्रँड प्रीमियर सोहळ्यातील आज स्पष्ट होणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये कोणते सपर्धक असणार यांची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर या वेळी बिग बॉस मराठीचे घर कसे असणार हे देखील पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते. मात्र, आता प्रतीक्षा संपली आहे. बिग बॉस मराठीच्या घरचा व्हिडीओ समोर आला आहे. 

बिग बॉस मराठीच्या घराची झलक

कलर्स मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर बिग बॉस मराठीच्या घराची पहिली झलक शेअर केली आहे. बिग बॉसचे यंदाचे घर हे मॉर्डन किचन आणि सुख-सुविधांनी सुसज्ज असं आहे. घरामध्ये स्पर्धकांना वेळ घालवण्यासाठी व टास्क खेळण्यासाठी प्रशस्त असं गार्डन देखील असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात यंदा बाल्कनी असणार आहे. या बाल्कनीमध्ये रॉयल सोफे व जंगल थीमनुसार सजवण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्याचबरोबर या घरातील बाथरुम काचेच्या महालासारखे डिझाइन करण्यात आले आहेत. स्पर्धकांना गप्पा मारण्यासाठी बाथरुमच्या दरवाज्यासमोर एक सोफा ठेवण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी देखील काचेची सजावट करण्यात आली आहे. गार्डनमध्ये खास स्विमिंग पूल सुद्धा तयार करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बिग बॉस मराठीच्या नव्या घराचं चाहते देखील कौतुक करत आहेत. 

बिग बॉस मराठीमध्ये परदेसी गर्ल 

बिग बॉस मराठी 5 च्या सीझन सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अशातच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परदेसी गर्लची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री होणार आहे. लवकरच तिचा बिग बॉसच्या घरातील संघर्ष बघायला मिळणार आहे. 28 जुलै रोजी रात्री 9 वाजता या ग्रँड प्रीमियर कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे.