Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या 16व्या सीझनबाबत मोठी घोषणा; 'या' तारखेपासून होणार सुरु

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता 'बिग बॉस'चा नवा सीझन घेऊन येत आहे. 'बिग बॉस'चा हा 16 वा सीझन असणार आहे. या नवीन सीझनबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच प्रेक्षकांना हा सीझन टीव्हीवर पाहता येणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.  

Updated: May 24, 2022, 08:41 PM IST
Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या 16व्या सीझनबाबत मोठी घोषणा; 'या' तारखेपासून होणार सुरु title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता 'बिग बॉस'चा नवा सीझन घेऊन येत आहे. 'बिग बॉस'चा हा 16 वा सीझन असणार आहे. या नवीन सीझनबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लवकरच प्रेक्षकांना हा सीझन टीव्हीवर पाहता येणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.  

कधी दिसणार टीव्हीवर? 
स्पॉटबॉयमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 'बिग बॉस 16' ऑक्टोबर 2022 पासून प्रीमियर होईल. हा शो दररोज रात्री 10:30 वाजता येईल आणि आठवड्याच्या शेवटी त्याचे प्रसारण रात्री 9 वाजता होईल.

'या' सेलिब्रिटींची नावे चर्चेत

सीझन 16 साठी अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'इमली' सीरियलचा अभिनेता गश्मीर महाजनी, दिव्यांका त्रिपाठी, मुनव्वर फारुकी, शिवांगी जोशी, माही विज हे या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणत्याही स्टारच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

तेजस्वी प्रकाशने 'बिग बॉस १५' जिंकले
गेल्या हंगामात तेजस्वी प्रकाश विजेती ठरली होती. मात्र, त्यावेळी करण क्रुंदा हा शो जिंकू शकतो, अशी भीती होती. पण तेजस्वीने अखेर बिग बॉसची ट्रॉफी जिंकली.