तू है के नही....Sidnaaz ची जोडी तुटली, पाहा सिद्धार्थ शुक्ला- शहनाज गिलची Love Story

सिद्धार्थच्या जाण्यानं कलाविश्वासह एका खास व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली.

Updated: Sep 3, 2021, 03:51 PM IST
तू है के नही....Sidnaaz ची जोडी तुटली, पाहा सिद्धार्थ शुक्ला- शहनाज गिलची Love Story
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Sidharth Shukla Death : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidhart Shukla) यानं वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फार कमी वयातच सिद्धार्थची अशी एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. सिद्धार्थच्या जाण्यानं कलाविश्वासह एका खास व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. ही व्यक्ती म्हणजे सिद्धार्थची अतिशय खास मैत्रीण शहनाज गिल (Shahnaz Gill). 

म्युझिक व्हिडीओच्या निमित्तानं सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या माध्यमातूनही शहनाज आणि सिद्धार्थची केमिस्ट्री दिसून आली. अधिकृतपणे या दोघांपैकी कोणीही नात्याची ग्वाही दिली नव्हती. पण, त्यांच्या वागण्याबोलण्यातून मात्र सारंकाही आपोआपच स्पष्ट होत होतं. 

पंजाबी चित्रपटसृष्टीती कतरिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाजनं अनेकदा उघडपणे आपल्याला सिद्धार्थ आवडतो, तो एक चांगला व्यक्ती आहे असं बोलूनही दाखवलं होतं. ती एका विश्वासार्ह व्यक्तीच्या प्रेमाच्या शोधात आहे हे तिच्या बोलण्यातूनच कळत होतं. 

चाहत्यांनीही या जोडीला भरभरुन प्रेम दिलं, सोशल मीडियावर त्यांच्या नावे फॅन पेज सुरु करण्यात आले. सिडनाज, असं त्यांना संबोधलं जाऊ लागलं. बिग बॉसच्या मंचावर अनेकदा शहनाजनं सिद्धार्थप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. कलाकारांमध्येही या नात्याची बरीच चर्चा झाली. या दोघांची केमिस्ट्री सगळंकाही सांगत होती. आता फक्त लग्नाचीच अधिकृत घोषणा करा म्हणजे झालं तर.... अशी मागणी चाहत्यांनी केली होती. पण, आता मात्र ही सारी स्वप्न कधीही पूर्ण न होणाऱ्या वळणावर पोहोचली आहेत. 

Sidharth Shuklaची 'अधुरी प्रेम काहणी', या 7 टीव्ही अभिनेत्रींसोबत होते प्रेमसंबंध

 

सिद्धार्थच्या निधनामुळं शहनाज एकटी पडली आहे, पुरती तुटली आहे. कालपरवापर्यंत आपल्या हाकेला ओ... देणारा सिद्धार्थ आज आपल्यात नाही यावर तिला विश्वास ठेवणं कठीण जाणार आहे. शहनाजची ही अवस्था पाहून अनेक कलाकार मित्रांनीही तिच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नात्यांची ही वीण घट्ट होण्याआधीच नियतीनं अशी काही उसवली की पुन्हा ती विणताही येणं कठीण झालं आहे.....  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x