Bigg Boss 11 विजेती शिल्पा शिंदेचा चाहत्यांना खास मेसेज

बिग बॉसचा 11 वा सीझन काल संपला. हीना खान, विकास, पुनीष आणि शिल्पा शिंदे या चौघांमध्ये अंतिम लढत रंगली. अखेर 'भाभी' फेम शिल्पा शिंदेने या पर्वाचे विजेतेपद जिंकले. 

Updated: Jan 15, 2018, 01:01 PM IST
Bigg Boss 11 विजेती शिल्पा शिंदेचा चाहत्यांना खास मेसेज  title=

 मुंबई : बिग बॉसचा 11 वा सीझन काल संपला. हीना खान, विकास, पुनीष आणि शिल्पा शिंदे या चौघांमध्ये अंतिम लढत रंगली. अखेर 'भाभी' फेम शिल्पा शिंदेने या पर्वाचे विजेतेपद जिंकले. 

 शिल्पाने मानले फॅन्सचे आभार  

 
 सुरूवातीपासूनच शिल्पा शिंदेचे फॅन्स तिच्या पाठीशी ठाम उभे होते. ट्विटरही शिल्पा शिंदेच्या समर्थनार्थ अनेक हॅशटॅग ट्रेन्ड करण्यात आले होते. चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावलेल्या शिल्पा शिंदेनेही विजेतेपदाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच चाहत्यांचे आभार मानले आहेत. 
 
 ट्विटरवर शिल्पा शिंदेने खास व्हिडिओदेखील शेअर केला आहे.  
 

 

 छोट्या पडद्यावरून घराघरात पोहचली  

 शिल्पा शिंदे गेली अनेक वर्ष हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करत आहे. 'भाभीजी घर  पे है' या मालिकेतून शिल्पाला खास ओळख  मिळाली. या मालिकेच्या निर्मात्यावर शिल्पाने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. निर्मात्याने हे आरोप फेटाळले. तसेच शिल्पाही या मालिकेपासून दूर झाली. त्यानंतर काही हिंदी  मालिकांमध्ये काम आणि एक आयटम सॉंग केल्यानंतर शिल्पा ' बिग बॉस 11' ची स्पर्धक झाली. अखेर तिने या कार्यक्रमाचे विजेतेपद जिंकले.