मुंबई:२० ऑगस्ट १९४६ साली जन्मलेल्या प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जीवनावर बायोपिक येणार आहे.दिग्दर्शक संजय त्रिपाठी हे सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. आजच्या बेरोजगारीच्या युगात तरुणांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नारायण मूर्ती यांची यशोगाथा तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल यात शंका नाही. नारायण मूर्ती यांनी बायोपिक बनवण्यास सपशेल नकार दिला होता. पण अनेक भेटींनंतर मूर्ती यांनी बायोपिक काढण्यास मंजूरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आठ महिन्यानंतर सिनेमाला मंजुरी मिळाली आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. २०१८ मध्ये ‘पॅडमॅन’,‘संजू’,‘सुरमा’यांसारखे बायोपिक पडद्यावर आले. नव्या वर्षाची सुरुवात ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सिनेमाने झाली. यानंतर ‘ठाकरे’,‘पीएम नरेंद्र मोदी’,‘मणिकर्णिका’, ‘सूपर ३०’सिनेमे प्रदर्शित होणार आहे. २००७ साली प्रसिध्द उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्या आयुष्यावर गुरू हा चित्रपट काढला होता.
कटर्नाकच्या चिक्काबल्लापूर येथे त्यांचा जन्म झाला. तांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षात त्यांनी स्वतःची कंपनी सुरु केली. पण त्यांना अपयश आले. सध्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.