मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी पहिले गाणे गायले. हे गाणे त्यांनी मराठी सिनेमासाठी गायले. मात्र, या गाण्याला सिनेमात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी सोलो गाणे गायले. १९४८ मध्ये रिलीज झालेल्या 'जिद्दी' या सिनेमात संधी मिळाली. 'जिंदगी का आसरा समझे, बडे नादान थे हम' या गाण्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही.
सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील अभिनेत्री कोशल हिला या गाण्याचे श्रेय दिले गेले. या सिनेमात तिचे नाव आशा होते. असे सांगितले जाते की, ज्यावेळी लता यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
१९६२ मध्ये एक दिवशी सकाली लतादीदी यांची तब्बेतअचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना '२० साल बाद'चे गाणे रेकॉर्ड करायचे होते. मात्र, अचानक तब्बेत बिघडली. त्यावेळी त्यांच्या रेकॉर्डींगचे काम रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरनी सांगितले की, खाण्यातून Slow Poison देण्यात येत होते. त्यानंतर बहीण उषा मंगेशकर यांनी दीदी लता यांच्या खाण्याची जबाबदारी स्विकारली. दरम्यान, आजतागायत कोणी Slow Poison देणाऱ्याचा पत्ता लागलेला नाही. तब्बेत ठिक होण्यास ३ महिने लागले.
'२० साल बाद'साठी त्यांनी एक गाणे गायले 'कहीं दीप जले कहीं दिल' हा किस्सा संगीतकार श्री रामचंद्र यांनी आपल्या पुस्तकात लिहीला आहे. लता १९४२ पासून आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. २००१मध्ये लता मंगेशकर यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आले आहेत.