आईसोबत खेळणारी ही Cute मुलगी आज आहे आघाडीची अभिनेत्री; ओळखला का हा चेहरा?

बालपणीच्या फोटोनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.   

Updated: Oct 21, 2021, 02:13 PM IST
आईसोबत खेळणारी ही Cute मुलगी आज आहे आघाडीची अभिनेत्री; ओळखला का हा चेहरा?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींचे अनेक फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होतात. यामध्ये त्यांच्या खासगी आयुष्याचे आणि बालपणीचे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीचे. दर दिवशी कोणा ना कोणा अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत असतो. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

आईनं उचलून घेतलेलं असताना चेहऱ्यावर स्मितहास्य असणारी ही अभिनेत्री आहे, अनुष्का शर्मा. अनुष्काच्या चेहरेपट्टीला पाहता काही चाहत्यांना तिला ओळखताही आलं आहे. 

'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अनुष्का शर्मा हिनं पाहता पाहता बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं. चित्रपटांसमवेत ती निर्मित क्षेत्रातही आली. वेब सीरिज आणि चित्रपटांच्या निर्मितीसाठी तिच्या निर्मिती संस्थेनं पुढाकार घेतला. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी अनुष्कानं लग्नगाठ बांधली. आघाडीच्या सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत ही जोडी कायमच सर्वांच्या मनाचा ठाव घेऊ लागली. सध्या अनुष्का मुलगी, पत्नी, अभिनेत्री आणि आई अशा चौफेर भूमिका बजावताना दिसत आहे.