close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खरा आमिर नेमका आहे तरी कसा? मुलीकडूनच याबाबतचा खुलासा

ती म्हणतेय.... 

Updated: Jun 18, 2019, 09:50 AM IST
खरा आमिर नेमका आहे तरी कसा? मुलीकडूनच याबाबतचा खुलासा

मुंबई : 'परफेक्शनिस्ट' म्हणून अभिनेता आमिर खान याने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. नव्या पिढीच्या कलाकारांनाही तितक्याच तोडीने टक्कर देणारा हा अभिनेता फक्त अभिनयच नव्हे, तर दिग्दर्शन, चित्रपट निर्मिती, सूत्रसंचालन आणि समाजसेवेच्या क्षेत्रांतही तितकाच प्रभावी काम करत आहे. एक वडील म्हणूनही तो आपली जबाबदारी पार पाडत आहे. 

आमिरच्या मुलांकडे सहसा एका सेलिब्रिटीची मुलं म्हणून पाहिलं जातं. पण, रुपेरी पडद्यापासून दूर असताना आणि आपल्या कुटुंबासमवेत आमिर तिथेही अगदी परफेक्टच असतो. तेव्हा मात्र त्याचं सेलिब्रिटीपण  कुठेतरी दूर असतं. कारण, तेव्हा तो एका सर्वसामन्य वडिलांच्याच भूमिकेत असतो. 

आमिरची मुलगी इरा खान हिनेच याविषयीचा खुलासा केला आहे. 'फादर्स डे'च्या निमित्ताने इराने आमिरसोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. हे शेअर करत असताना कॅप्शनमध्ये तिने एक 'बाबा' म्हणून नेमका आमिर कसा आहे याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या. ज्यामध्ये तिने आमिरचे आभारही मानले आहेत. गरज पडली तेव्हा प्रत्येक वेळी आमिर, म्हणजेच हा 'परफेक्ट बाबा' आपल्या हाकेला धावून आल्याविषयी तिने कृतज्ञताही व्यक्त केली आहे. 

इराचं आमिरप्रती असं व्यक्त होणं हे त्यांच्या नात्याची भावनिक मांडणी करण्याप्रमाणेच ठरत आहे. सध्याच्या घडीला इरा ही तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी आमिरची ही लेक तिच्या खासगी आयुष्यामळे चर्चेत आहेच. शिवाय चित्रपटांच्या विश्वाविषयी तिच्या मनात असणारं आकर्षण पाहता येत्या काळात ती करिअरच्या नेमक्या कोणत्या वाटांची निवड करते  हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.