आमिरच्या 'परफेक्ट' मदतीमुळे वाचली किआरा, नाहीतर सर्वांसमोर...

त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे

Updated: Aug 12, 2021, 09:13 PM IST
आमिरच्या 'परफेक्ट' मदतीमुळे वाचली किआरा, नाहीतर सर्वांसमोर...
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : आमिर खान आणि त्याचा उल्लेख होताना वापरला जाणारा परफेक्ट हा शब्द, हे एक अफलातून समीकरण आहे. परफेक्शनिस्ट अशी आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता आमिर खान, यानं नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथं जे काही घडलं, त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. 

AU small finance bank च्या एका कार्यक्रमासाठी आमिर आणि अभिनेत्री किआरा अडवाणीनं हजेरी लावली होती. त्यावेळी किआरा अशी काही अडचणीत आली की, सर्वांसमोर आमिर तिच्या मदतीसाठी धावून गेला. 

कार्यक्रमासाठी कोविड नियमांअंतर्गत हे दोन्ही सेलिब्रिटी मास्क घालून आले. इथं आल्यानंतर त्यांना मास्क काढण्यास सांगण्यात आलं. आमिरनं लगेचच आपला मास्क काढला. पण, किआरा मात्र मास्क काढतानाचा काहीशी गोंधळलेली दिसली. तिच्या फॅन्सी कानातल्यांमध्ये हा मास्क अडकला होता. मास्क काढण्यासाठी किआराचा होणारा गोंधळ पाहून अखेर आमिरनंच तिला मदत करण्याचा निर्णय घेत तो मास्क काढून दिला. 

आमिर आणि किआराची उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला. अनेक फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. जे पाहून चाहत्यांनी आमिरचं तोंड भरुन कौतुक केलं. 

 

दरम्यान, किआरा अडवाणी (Kiara advani)ही सध्या तिच्या 'शेरशाह' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. 'कबीर सिंग' या चित्रपटानंतर किआरा प्रसिद्धीझोतात आली, ज्यानंतर आता तिच्या नव्या चित्रपटानंही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'शेरशाह'च्या निमित्तानं किआरा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना पाहता येत आहे. मुख्य म्हणजे ही जोडी त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेही चर्चेत आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@perfectaamir)