खिलाडी कुमारनं साकारलेलं 'लक्ष्मी'चं हे रुप तुम्ही पाहिलं?

चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून.... 

Updated: Nov 3, 2020, 09:09 PM IST
खिलाडी कुमारनं साकारलेलं 'लक्ष्मी'चं हे रुप तुम्ही पाहिलं?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळं प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून ते अगदी आता त्यातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईपर्यंत चाहत्यांची उत्सुकता तर, शिगेलाच पोहोचली होती. 

खुद्दद खिलाडी कुमारनंच सोशल मीडियावर चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्यानं आपल्या या नव्या भूमिकेतील अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आणला. यामध्ये खिलाडी कुमार एका तृतीयपंथी भूमिकेत झळकत आहे. त्याचं रुप, हावभाव आणि गाण्याचे बोल कमालीचे लक्षवेधी ठरत आहेत. बम भोले असे या गाण्याचे बोल आहेत. 

राघल लॉरेन्स यांच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट ९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, डिस्ने ह़ॉटस्टार प्लस येथे त्याचा प्रीमियर करण्यात येणार आहे. 

चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा 'लक्ष्मी बॉम्ब' अशा नावानं हा प्रोजेक्ट सर्वांपुढं आला. पण, हिंदू देवता लक्ष्मीच्या नावापुढं असणाऱ्या शब्दांमुळे यावर आक्षेप घेतला गेला होता. ज्यानंतर चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं.