VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले? 

Updated: Apr 2, 2023, 03:53 PM IST
VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=

Amir Khan Trolled at NMACC India Launch with Children: नीता अंबानी यांच्या 'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर'चे (NMACC India Launch 2023) नुकतेच मुंबईत उद्घाटन झाले. यावेळी बॉलिवूडमधील सेलिब्रेटी मंडळी या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित होती. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननंही (Amir Khan Trolled) आपल्या मुलासह आणि जावयासह या सोहळ्याला उपस्थितीत दर्शवली होती. त्यामुळे नेटकऱ्यांच्या नजरा आमिरच्या लेकरांकडेच खिळल्या होत्या. यावेळी नेटकऱ्यांनी मात्र त्यांना चांगलेच ट्रोल केले. यावेळी परिधान केलेल्या वेशभूषेवरूनही (Amir Khan Wear) ते सगळेच ट्रोल झाले. आमिर खान यावेळी एकाच वेळी आपल्या सर्व मुलांसोबत एकाच फ्रेममध्ये दिसला. (Bollywood actor amir khan attends nmacc india launch event with ira khan nupur shikhare gets trolled suspicious lady video viral)

आमिर खान मुलगी आयरा खान, मुलगा जुनैद खान (Ira Khan and Nupur Shikhare Engagement) आणि आझाद खान यांच्यासमवेत उपस्थित होता. त्याचसोबत यावेळी आयरा खान आणि तिचा होणारा नवरा, आमिर खानचा जावई नुपूर शिखरेही उपस्थित होता. जुनैद आणि आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलं आहेत तर आझाद खान हा किरण राव (Kiran Rao) आणि आमिर खानचा मुलगा आहे. 

आमिर खान ट्रोल : 

आमिर खानच्या परिवाराला कुठे कसे कपडे घालायचे याची काहीच पोच नाही अशी कमेंटही काही नेटकऱ्यांनी (Amir Khan Fashion at NMACC India) केली आहे. यावेळी अंबानींच्या पार्टीला आलेल्या आमिर खान आणि कुटुंबियांना पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली. या सगळ्यांमध्ये एक अनोखळी मुलगीही दिसली. तिला पाहूनही नेटकऱ्यांनी अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी काहींनी म्हटलं की, हा तर गोलमाल आहे. तर एकानं म्हटलं की, आमिर खानच्या परिवाराला पाहिलं की काहीतरी खिचडीसारखं वाटतं. तर एका युझरनं कमेंट केली की, आमिरची चौथी बायको कुठे आहे? यावेळी फतिमा सना शेखचा थेट उल्लेख न करता ती दंगल गर्ल कुठे आहे अशी कमेंटही केली. 

पुन्हा रंगल्या 'त्या' चर्चा : 

आमिर खान आणि रीना दत्ता यांचे लग्न झाले होते. त्यांना आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत. 15 वर्षांच्या सहजीवनानंतर मात्र त्या दोघांनी घटस्फोट (Amir Khan and Kiran Rao Divorce) घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिर खान हा किरण रावच्या प्रेमात पडला होता. त्या दोघांनी लग्न केले. त्यांना आझाद नावाचा एक लहान मुलगाही आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परंतु त्या दोघांनीही आता घटस्फोट घेतला आहे. मध्यंतरी 'दंगल' (Dangal) चित्रपटातील अभिनेत्री फतिमा सना शेख हिच्यासोबतही आमिरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मागच्या वर्षी आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chadda) हा चित्रपटही फ्लॉप गेला होता.