प्रभाससोबतच्या चित्रपटासाठी बिग बींचं मानधन ऐकून धक्काच बसेल

दीपिकालाही टाकलं मागे....   

Updated: Oct 11, 2020, 10:59 PM IST
प्रभाससोबतच्या चित्रपटासाठी बिग बींचं मानधन ऐकून धक्काच बसेल
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मोठ्या कलाकारांची वर्णी एखाद्या चित्रपटासाठी लागली असता सर्वाधिक चर्चा रंगते ती म्हणजे या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाची. येत्या काळात असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास असे आघाडीचे आणि तितकेच लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. 

नाग अश्विन दिग्दर्शित या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी कलाकारांना तगडं मानधन मिळाल्याच्या चर्चा आहेत. खुद्द दीपिका पदुकोणनं या चित्रपटासाठी २० कोटी रुपये इतकं मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटासाठी अभिनेता प्रभास यानं तब्बल १०० कोटी रुपये इतकं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या या मानधनात डबिंग राईट्सनं मिळणाऱ्या रकमेचाही समावेश असल्याचं कळत आहे. तर, महानायक अमिताभ बच्चन यांना दीपिकापेक्षाही जास्त मानधन देण्यात आल्याची चर्चा आहे. 

 

बिग बींच्या मानधनाचा आकडा प्रभासइतका मोठा नसला तरीही तो इतरांना थक्क करणारा आहे हे खरं. नेमक्या आकड्याविषयी अद्यापही अनिश्चितता असली तरीही ५० कोटींच्या घरात हा आकडा असल्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. त्यामुळं हे कोट्वधींचं मानधन अनेकांना अवाक करुन सोडत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा हा २१ वा चित्रपट आहे. तर, दीपिका या चित्रपटाच्या निमित्तानं तेलुगू कलाविश्वात पदार्पण करत आहे. एकंदरच तगडी स्टाकरास्ट पाहता या चित्रपटाची आतापासून उत्सुकता पाहायला मिळत आहे.