बॉलिवूड अभिनेत्याच्या २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम

कौटुंबीक न्यायालयाकडून घटस्फोट प्रक्रिया पूर्ण   

Updated: Nov 21, 2019, 04:05 PM IST
बॉलिवूड अभिनेत्याच्या २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्याने अखेर त्याच्या पत्नीसोबतच्या जवळपास २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. आपल्या खासगी जीवनाविषयी कायमच काही स्पष्ट भूमिका मांडत प्रकाशझोतात असणारा हा अभिनेता आहे, अर्जुन रामपाल Bollywood actor arjun rampal. 

'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (मंगळवार) १९ नोव्हेंबर २०१९ला या दोघांचा अधिकृतणे घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. परिणामी मेहेर जेसिया हिच्यासोबतचं त्याचं २१ वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं. 

परस्पर सामंजस्यातून हा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे. १९९८ मध्ये अर्जुन आणि मेहेर यांनी लग्न केलं होतं. या नात्यातून त्यांना दोन मुली आहेत. माहिका आणि मायरा अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्या आईकडे म्हणजेच मेहेरकडे राहील अशीही माहिती सूत्रांनी दिली. 

मागील वर्षी म्हणजेच २८ मे, २०१८ला या दोघांनीही त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची बाब जाहीर केली होती. ज्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला. नात्यात कितीही दुरावा आला असला तरीही मेहेर आणि अर्जुन यांनी एकमेकांमध्ये असणारी मैत्री आणि त्याच मैत्रीच्या आधारे एकमेकांना पाठींबा देणं मात्र सुरूच ठेवलं. 

Arjun Rampal and wife Mehr Jessia end 21 years of marriage, granted divorce by family court

मेहेरपासून वेगळं झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यांतच अर्जुन आणि मॉडेल, डिझायनर गॅब्रिएला डेमेट्रीएड्स यांच्या नात्याच्या चर्चा समोर आल्या. पुढे त्यांच्या या नात्यावरही शिक्कामोर्तबही करण्यात आलं. जुलै महिन्यात अर्जुन आणि त्याच्या प्रेयसीच्या जीवनात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला. ज्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला.