'माझ्या मुलाला परत दे', बॉलिवूड अभिनेत्याकडे प्रेयसीची मागणी

प्रेयसीचा मोठा खुलासा 

Updated: Aug 26, 2019, 01:18 PM IST
'माझ्या मुलाला परत दे', बॉलिवूड अभिनेत्याकडे प्रेयसीची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिएला यांच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीत एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अर्जुनने सोशल मीडियाच्या माघ्यामातून आपल्या प्रेयसीला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. ज्यानंतर कलाकार मित्रमंडळींपासून चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अर्जुनची प्रेयसी, सध्या तिच्या मुलासह अर्जुनच्या पहिल्या लग्नापासून असणाऱ्या दोन्ही मुलींसोबतचं नातं आणखी खुलवण्यास प्राधान्य देताना दिसत आहे. 

सोशल मीडियाच्याच माध्यमातून अर्जुनने त्याच्या आणि गॅब्रिएलाच्या नात्याविषयीही माहिती दिली होती. बराच काळ त्यांनी गॅब्रिएलाच्या गरोदरपणाची बातमी गुलदस्त्यात ठेवल्यानंतर मोठ्या अनोख्या अंदाजात त्याविषयीसुद्धा सर्वांनाच माहिती दिली. आताच्या घडीला अर्जुन आणि त्याची प्रेयसी या मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत करत आहेत. सोबतच काही नात्यांना आणखी खुलवण्याकडेही त्यांचा कल आहे. 

पालकत्वासाठी आपण तयार आहोत की नाही, इथपासून आपण मित्रांमध्ये वयाने सर्वात कमी असल्यामुळे अशा जबाबदारीच्या अनेक विषयांवर चर्चा व्हायची, असं गॅब्रिएलाने 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पालकत्वाच्या या भावनेविषयी तिने सकारात्मक मत सर्वांसमोर ठेवलं. 

गरोदरपणातील दिवसांविषयीसुद्धा तिने हा काळ तुलनेने आव्हानात्मक असल्याचं सांगितलं. बाळाचा चेहरा पाहण्याच्या क्षणापर्यंत प्रतिक्षा कर... अशा शब्दांत आईकडून धीर मिळाल्याचंही तिने न विसरता सांगितलं. या साऱ्यामध्ये अर्जुनची पावलोपावली साथ लाभल्याचं सांगत अनेकदा Arik त्याच्याचकडे जास्त असतो, तेव्हा मला माझा मुलगा परत ते असंच आपण म्हणत असल्याची बाबही तिने सांगितली. 

अर्जुन आणि त्याची पहिली पत्नी मेहर यांच्या मुलींसोबतही गॅब्रिएलाच्या मुलाचं म्हणजेच लहानग्या Arikचं प्रेमाचं नातं आहे. त्या दोघीही त्याच्यावर फार प्रेम करतात असं तिने या मुलाखतीत न विसरता सांगितलं. आजच्या घडीला अर्जुनप्रती त्या दोघींच्याही मनात आदर आहे, पण तो त्यांचा तितकाच चांगला मित्रही आहे. असं सांगत येत्या काळात Arikसोबतचही त्यांचं असंच नातं आकारस यावं अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.