ICUमधील अनुभव सांगत अभिनेता म्हणतो, मी ऑक्सिजन सपोर्टवर होतो....

जवळपास चार दिवसांसाठी त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. 

Updated: Oct 25, 2020, 12:59 PM IST
ICUमधील अनुभव सांगत अभिनेता म्हणतो, मी ऑक्सिजन सपोर्टवर होतो....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मागील बऱ्याच काळापासून coronavirus कोरोना व्हायरसच्याच दहशतीखाली सर्वजण जगत आहेत. अतिशय आव्हानाच्या दिवसांचा सामना या दरम्यानच्या काळात प्रत्येकानंच केला आहे. अगदी कलाकार मंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. अशाच एका कलाकारानं आपल्यालाही कोरोना संसर्ग झाल्याचं सांगत रुग्णालयातील अऩुभव सर्वांसमोर मांडला आहे.

जवळपास चार दिवसांसाठी या अभिनेत्याला रुग्णालयातील आयसीयू कक्षात ठेवण्यात आलं होतं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भातील खुलासा करणारा अभिनेता आहे, हर्षवर्धन राणे. Taish या चित्रपटासाठी तयारी करणाऱ्या या अभिनेत्याला डोकेदुखी आणि ताप आल्याचं जाणवताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

पहिल्यांदाच डॉक्टरकडे गेलं असता आपल्याला किरकोळ ताप असल्याचं जाणवलं. पण, काही दिवसांसाठी औषधं घेऊनही ताप उतरलाच नाही आणि डोकेदुखीसुद्धा कायमच राहिली त्यामुळं आपण रुग्णालयात दाखल झाल्याचं हर्षवर्धन म्हणाला. दरम्यान, त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली होती. 

याचबाबत सांगताना हर्षवर्धन म्हणाला, 'मी जवळपास चार दिवसांसाठी आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर होतो. आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये मी सहभागी होऊ शकलो नाही, याची खंतच आहे. मला आताही अशक्तपणा जाणवतो. साधारण डोकेदुखी आणि हलकासा ताप या साऱ्यापासून याची सुरुवात झाली होती. चार दिवसांनंतरही ताप कमी होण्याचं नावच घेत नव्हता तेव्हा मग मी रुग्णालयात गेलो. तिथं माझी कोविड चाचणी केली गेली. ज्यामध्ये मला कोरोना संसर्ग झाल्याची बाब समोर आली. आणखी दोन दिवसांनीही ताप कमी झालाच नाही तेव्हा मी पुन्हा रुग्णालयात गेलो. तेव्हा मात्र त्यांनी मला तातडीनं आयसीयूमध्ये दाखल करुन घेतलं. त्यानंतर जवळपास आठ दिवसांनी माझी डोकेदुखी आणि ताप कमी झाला'. 

Taish Actor Harshvardhan Rane Gets Admitted to ICU For 4 Days After Contracting COVID-19, Read on

 

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आपलं योगदान देता न आल्याची खंत या देखण्या अभिनेत्याला असली तरीही आरोग्याची काळजी घेत योग्य उपचारानंतर प्रकृती सावरल्याचा दिलासाही त्याला आहे.