गरोदर अनुष्काला ऐन नवरात्रोत्सवात हवा झाला 'हा' पदार्थ

पाहा यासाठी तिनं नेमकं काय केलं... 

Updated: Oct 25, 2020, 12:08 PM IST
गरोदर अनुष्काला ऐन नवरात्रोत्सवात हवा झाला 'हा' पदार्थ
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गरोदरपणातही अभिनेत्री अनुष्का शर्मा चाहत्यांना फिटनेस, हॅपिनेस आणि फॅशन गोल्स द्यायला अजिबातच विसरलेली नाही. अशी ही अभिनेत्री सध्या दुबईमध्ये आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामासाठी अनुष्काचा पती विराट कोहली हा दुबईला रवाना झाला, त्याच्यामागोमागच अनुष्कानंही दुबई गाठलं. 

परदेशवारीवर असणारी ही अभिनेत्री तिथं गेली खरी. पण, याचदरम्यान तिला ऐन नवरात्रोत्सवाच्या दिवसांतच एक पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा झाली. बरं, मग करावं तरी काय अशा मनस्थितीत असणाऱ्या अनुष्कानं थेट तिच्या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून या खास पदार्थांचा फोटो पोस्ट करत तितक्यावरच भूक भागवली. 

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

अनुष्काला एकाएकी ज्या पदार्थाची भूक लागली ते म्हणजे नवरात्रोत्सवादरम्यान प्रसाद म्हणून देण्यात येणारं पूरी- चना आणि हलवा. उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहात नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळते. त्यातच प्रसाद म्हणून देवीपुढं हे पदार्थ ठेवत दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला हा प्रसाद दिला जातो. पण, यंदाच्या वर्षी मात्र याच दिवसांमध्ये परदेशात असल्यामुळं अनुष्काला काही, या पदार्थाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळं तिनं एका पोस्टवरच आपली भूक भागवली असं म्हणणं वावगं ठरणार ऩाही.