रात्रीचा अंधार, विस्कटलेले केस आणि सोबत हृतिक; सबा आझादला पाहून नेटकऱ्यांना धक्का

यावेळी त्यांनी कोणापासूनही चेहरा लवपवला नव्हता

Updated: Apr 6, 2022, 11:34 AM IST
रात्रीचा अंधार, विस्कटलेले केस आणि सोबत हृतिक; सबा आझादला पाहून नेटकऱ्यांना धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची प्रेयसी सबा आझाद सध्या त्यांच्या नात्यामध्ये बराच काळ एकमेकांना देताना दिसत आहेत. सबा आणि हृतिक आतापर्यंत कोणा एका हॉटेलमधून, कॅफेमधून बाहेर येताना दिसले. ज्यानंतर आता ही जोडी थेट विमानतळाबाहेरच एकमेकांचा हात पडकून बाहेर पडताना दिसली. (Bollywood saba azad hritik roshan )

यावेळी सबा आणि हृतिक प्रचंड आनंदात दिसत होते. यावेळी त्यांनी कोणापासूनही चेहरा लवपवला नव्हता. त्यामुळं चर्चांनी जोर धरला. 

त्यानंतर हृतिक आणि सबाचे रात्री पार्टी करतानाचे फोटो समोर आले. अभिनेत्री पूजा बेदी हिनं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले. 

इथं पार्टी करत असताना सबाचे केस विस्कटलेले दिसले, किंबहुना हा फोटोही काहीसा ब्लरही दिसला. पूजानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हृतिकची Ex Wife सुझान आणि तिचा प्रियकर अर्सलानही गिसला. 

गोव्यामध्ये या जोड्यांनी धमाल केली. त्यांच्यासाठी ही पार्टी पूजानं आयोजित केली होती. यामध्ये सुझानच्या कुटुंबातील काही मंडळींचीही हजेरी पाहायला मिळाली होती. 

काही दिवसांपूर्वीच हृतिक आणि सबा पहिल्यांदाच माध्यमांच्या नजरेत आले. त्यानंतर हा सिलसिला असाच सुरु राहिला. सुरुवातीला माध्यमांपासून लपून फिरणारी ही जोडी आता मात्र सर्रास आपल्या या नात्याची ग्वाही देताना दिसत आहे. 

बॉलिवूडमध्ये सध्या या नव्यानं दिसलेल्या जोडीचीही बरीच चर्चा सुरु आहे. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे या दोघांकडूनही नात्याबाबत अधिकृत वक्तव्य केव्हा केलं जातं याबाबतची...