''खाण्यासाठी धडपडतोय रणबीर'', असं म्हणत चाहते का करतायेत ट्रोल? 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच

यावेळी चेन्नईमध्ये रणबीरचं ढोल वाजवत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. 

Updated: Aug 24, 2022, 07:33 PM IST
''खाण्यासाठी धडपडतोय रणबीर'', असं म्हणत चाहते का करतायेत ट्रोल? 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच title=

Ranbir Kapoor Viral Video: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा आणि अलिया भट्टचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट लवकरच रिलिझ होतो आहे. यासाठी सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच रणबीर कपूर त्याच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईत आल्यावर नागार्जुन आणि एसएस राजामौली यांच्यासोबत खास दाक्षिणात्त्य जेवणाता आस्वाद घेतला. 

यावेळी चेन्नईमध्ये रणबीरचं ढोल वाजवत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले, यावेळी आपल्या प्रमोशनच्या दरम्यान तो नागार्जून आणि एसएस राजामौलीसोबत केळीच्या पानावर मस्त टेस्टी दाक्षिणात्त्य जेवण जेवला. या व्हिडीओवर चाहत्यांनी नाना प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका कमेंटमध्ये नेटकऱ्याने लिहिले की रणबीर जेवताना खूपच धडपडतोय. तर अनेकांनी जेवताना त्याचा हा शांत स्वभाव पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत रणबीर किती साधेपणाने जेवतो आहे असेही कमेंट केले आहे. 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर केळीच्या पानावर साऊथ इंडियन जेवण पारंपरिक पद्धतीने खाताना दिसत आहे. एसएस राजामौली आणि नागार्जुन त्यांच्या शेजारी बसले होते. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर मुख्य भूमिकेत आहे, तर नागार्जुन यांचीही भूमिका आहे. 

नागार्जुनने जवळजवळ दोन दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर ब्रह्मास्त्र या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट रणबीरचा पत्नी आलिया भट्टसोबतचा पहिला चित्रपट आहे. अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.