...म्हणून दीपिकाच्या चौकशीच्या वेळी उपस्थित राहू द्या; रणवीरची NCB ला विनंती

दीपिका आणि रणवीर गोव्यातून मुंबईत दाखल 

Updated: Sep 25, 2020, 10:36 AM IST
...म्हणून दीपिकाच्या चौकशीच्या वेळी उपस्थित राहू द्या; रणवीरची NCB ला विनंती
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण Deepika Padukone आणि तिचा पती रणवीर सिंग Ranveer Singh हे अखेर एनसीबीचं समन्स मिळाल्यानतंतर गोव्यातून मुंबईत दाखल झाले. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकरा या साऱ्यांनी रणवीर- दीपिकाला गराडा घातल्याचं पाहायला मिळालं. 

NCB एनसीबीकडून दीपिका आणि बॉलिवूडमधील काही आघाडीच्या कलाकारांना समन्स बजावण्यात आलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडून चौकशी सुरु असणाऱ्या ड्रग्ज कनेक्शनबाबतच्या चौकशीअंतर्गत हे समन्स या कलाकार मंडळींना बजावण्यात आलं आहे. ज्यानंतर आता शनिवारी दीपिकाची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाचा पती अर्थात अभिनेता रणवीर सिंग यानं तिच्या चौकशीच्या वेळी सदर ठिकाणी तिच्यासोबतच उपस्थित राहण्याची विचारणा एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. दीपिकाला अशा प्रसंगी अत्यंत भीती आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. शिवाय तिचा गोंधळ उडतो त्यामुळं तिच्यासोबत चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विचारणा त्यानं आपल्या अर्जात केली आहे. 

 

कायद्याबाबत आपल्याला आदर असून, चौकशीदरम्यान त्याच ठिकाणी उपस्थित राहण्यास परवानगी दिली जात नसल्याचं आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. असं असलं तरीही, आपल्याला एनसीबीच्या कार्यालयात येण्यास अनुमती द्यावी यासाठी तो आग्रही दिसत आहे. रणवीरनं केलेली ही विचारणा पाहता एनसीबी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.