close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रियांकासोबत काम करण्यास सलमानचा नकार

तिच्याऐवजी दुसऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झळकणार असल्याच्या चर्चा 

Updated: Oct 4, 2019, 12:57 PM IST
प्रियांकासोबत काम करण्यास सलमानचा नकार
प्रियांकासोबत काम करण्यास सलमानचा नकार

मुंबई : अभिनेता सलमान खान येत्या काळात काही धमाकेदार चित्रपट आणि तितक्याच धमाकेदार भूमिकांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२० या वर्षासाठी त्याचे एकामागोमाग एक असे तीन चित्रपट रांगेत आहेत. 'दबंग ३' या चित्रपटाव्यतिरिक्त तो 'किक २' या चित्रपटातून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

मुख्य म्हणजे एकिकडे सलमानच्या चित्रपटांची रांग संपत नसतानात एक मह्त्त्वाची बाब त्याने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केली होती. संजय लीला भन्साळी यांच्या 'इंशाअल्लाह' या चित्रपटातून तो आलियासोबत झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, आपण हा चित्रपच करत नसल्याचं खुद्द सलमाननेच सांगितलं होतं. त्याऐवजी आता २०२० मध्ये ईदच्या मुहूर्तावर तो 'राधे' या चित्रपटातून झळकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 'द आऊटलॉज' या कोरियन चित्रपटाचा रिमेक म्हणून 'राधे' साकारला जाणार आहे. 

'राधे'मधून सलमान पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यासाठी त्याला साजेशा अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. या चित्रपटासाठी सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी प्रियांका चोप्रा हिचं नाव पुढे करण्यात आलं होतं. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटानंतर प्रियांकाच्या हाती सध्यातरी कोणताही चित्रपट नाही. ज्यामुळे तिचं नाव पुढे करण्यात आलं होतं. 

Salman Khan refuses to work with Priyanka Chopra, will he return with Katrina Kaif for Eid 2020?

असं असलं तरीही सलमानने मात्र तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि प्रियांका यांच्या पडलेली वादाची ठिकणी यामागचं कारण असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, प्रियांकाऐवजी त्याने अभिनेत्री कतरिना कैफ हिचं नाव सुचवल्यामुळे आता येत्या काळात कतरिना आणि सलमान ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची चिन्हं आहेत. तेव्हा आता या चित्रपटात नेमकी कोणाची वर्णी लागते आणि प्रियांका- सलमानचा हा वाद नेमका कधी मिटतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.