Shahrukh Khan Birthday : राजाचं आयुष्य जगतो शाहरुख; पाहा त्याचं दुबईतील घर

त्याचा आशियाना मोठ्या रुबाबात उभा आहे.   

Updated: Nov 2, 2021, 01:40 PM IST
Shahrukh Khan Birthday : राजाचं आयुष्य जगतो शाहरुख; पाहा त्याचं दुबईतील घर title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचं नाव मागच्या अनेक दिवसांपासून सर्वच चर्चांमध्ये पाहायला मिळालं. शाहरुखचा मुलगा आर्यन खान कारागृहात असल्यापासूनच चाहत्यांनी त्याला पाठिंबा देत कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणं साथ त्याला दिली. ज्यानंतर आता किंग खानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या घराबाहेर येत या अभिनेत्यासाठी त्यांनी आपलं प्रेमही मोठ्या हक्कानं व्यक्त केलं. 

शाहरुखचा उल्लेख बॉलिवूडचा किंग असा केला जातो. पण, राहणीमानाच्या बाबतीत तो खऱ्या अर्थानं किंगच आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईतील अगदी मोक्याच्या ठिकाणी त्याचा आशियाना मोठ्या रुबाबात उभा आहे. (Shahrukh khan)

फक्त मुंबईच नव्हे, तर दुबईतही त्याचं आलिशान घर आहे. दुबईतील अतिशय लोकप्रिय आणि साऱ्या जगाचं लक्ष असणाऱ्या जुमेराह बीच भागात त्याचं घर आहे. त्याचा हा व्हिला जवळपास 8500 चौरस फुटांच्या भूखंडावर उभा आहे. तर या पूर्ण प्ल़ॉटचा खूखंड 14000 चौरस फुटांचा आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार सप्टेंबर 2007 मध्ये दुबईतील एका प्रॉपर्टी डेव्हलपरने त्याला हा व्हिला भेट स्वरुपात दिला होता. त्यावेळी याची किंमत जवळपास 18 कोटी रुपये इतकी होती. 

शाहरुखच्या दुबईतील या व्हिलामध्ये 6 बेडरूम आणि दोन रिमोट कंट्रोल गॅरेज आहेत. अतिशय सुरेख पूल आणि प्रायव्हेट बीचही या व्हिलाचा एक अविभाज्य भाग आहेत. 

शाहरुखच्या दुबईतील व्हिलामध्ये त्याची पत्नी गौरी खान हिनं खास टच दिला आहे. तिनं या घराच्या इंटेरियरचं काम केलं आहे.