बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मिरा कपूर (Mira Kapoor) यांनी वरळीमधील आपलं आलिशान घर भाड्याने दिलं आहे. SquareYards ने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पेपर्सच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, शाहीद कपूरने पाच वर्षांसाठी आपलं घर भाड्याने दिलं आहे. शाहीद कपूरला महिन्याला 20 लाख भांड मिळणार आहे. हे अपार्टमेंट ओबेरॉय रियल्टीच्या थ्री सिक्स्टी वेस्ट नावाच्या इमारतीत. 5,395 चौरस फूटाचं हे अपार्टमेंट असून कागदपत्रांनुसार, तीन कार पार्किंगसह ते भाड्याने देण्यात आलं आहे.
7 नोव्हेंबर रोजी पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडे करार नोंदणीकृत करण्यात आला. डी'डेकोर होम फॅब्रिक्सचे (D'Decor Home Fabrics) वरिष्ठ अधिकारी दीपन भूपतानी यांना हे अपार्टमेंट भाड्यानं देण्यात आलं आहे. SquareYards ने निवेदनात म्हटलं आहे की, नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदणीकृत केलेला करार 60 महिन्यांच्या (5 वर्षांच्या) कालावधीसाठी आहे. यासाठी 1 कोटी 23 लाखांचं डिपॉझिट देण्यात आलं आहे.
स्क्वेअर यार्ड्सनुसार, ही मालमत्ता सरासरी 4 ते 5 टक्के एकूण भाडे उत्पन्न देईल. करारानुसार सुरुवातीला महिन्याचं भाडं 20.5 लाख असेल. नंतर हे भाडं वाढून पाच वर्षांची मुदत संपेपर्यंत 23.98 लाख असेल. याव्यतिरिक्त, करारामध्ये पहिल्या 10 महिन्यांसाठी भाडेमुक्त कालावधी समाविष्ट आहे, अशी माहिती SquareYards ने दिली आहे. शाहीद कपूर किंवा दीपन भूतनानी यांनी यावर अधिकृतपणे काही माहिती दिलेली नाही.
वरच्या मजल्यावर असलेलं हे अपार्टमेंट कपूर दाम्पत्याने मे 2024 मध्ये चांदक रिअलटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून जवळपास 60 कोटींना खरेदी केलं होतं. चांदक रियल्टीने फेब्रुवारी 2023 मध्ये येथे अनेक फ्लॅट खरेदी केले होती. त्यात या अपार्टमेंटचाही समावेश होता. दरम्यान D'Mart चे मालक राधाकिशन दमाणी यांच्या निकटवर्तीयांनी आणि जवळच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षी 1238 कोटींमध्ये 28 अपार्टमेंट खरेदी केले होते.
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सेलिब्रिटींच्या लीगमध्ये सामील झाला आहे ज्यांनी अलीकडेच मुंबईतील त्यांची आलिशान मालमत्ता भाड्याने दिली आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या मालमत्ता भाड्याने दिलेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये कार्तिक आर्यन, रणवीर सिंग आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा समावेश आहे.