close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणवीरच्या गाण्यावर टायगर श्रॉफची 'खलीबली'; व्हिडिओ व्हायरल

चाहत्यांच्या मनावरही त्याचं राज्य असल्याचं नेहमीच स्पष्ट होतं.   

Updated: Jun 26, 2019, 10:18 AM IST
रणवीरच्या गाण्यावर टायगर श्रॉफची 'खलीबली'; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या दिलखुलास अंदाजासाठी कायमच ओळखला जातो. चित्रपटातील भूमिकांमुळेही रणवीरने स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. प्रत्येक वेळी स्वत:लाच आव्हान देत स्वत:वरच मात करत तो अशा काही भूमिकांना रुपेरी पडद्यावर जिवंत करतो की विचारून सोय नाही. त्याने साकारलेली अशीच एक भूमिका म्हणजे अलाऊद्दीन खिल्जीची. 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या खिल्जीला प्रेक्षकांची जितकी पसंती मिळाली तितकीच पसंती त्याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या 'खलीबली' या गाण्यालाही मिळाली. 

रणवीरचा अंदाज, गाण्याचे बोल आणि ताल पाहता ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं. याच धर्तीवर आता या गाण्याना अभिनेता टायगर श्रॉफने एका अनोख्या आणि तितक्याच प्रभावी प्रकारे सादर केलं आहे.

हिप- हॉप या नृत्यप्रकारातील खरा 'किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वविख्यात अशा मायकल जॅक्सन यांच्या स्मृतिदिनानिमित्त टायगरने त्याचं नृत्यकौशल्य सादर केलं. नृत्याच्या माध्यमातून त्याने आदर्शस्थानी असणाऱ्या जॅक्सन यांना आदरांजली वाहिली. यावेळी टायगरचं नृत्य पाहता त्याने शेअर केलेल्या व्हिडिओची प्रेक्षकांनी भरभरुन प्रशंसा केली. एका अर्थी रणवीरच्या गाण्यावर टायगरची 'खलीबली' चांगलीच गाजली असं म्हणायला हरकत नाही. 

टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयासोबतच नृत्य आणि शारीरिक सुदृढतेसाठीही ओळखला जातो. अतिशय कठीण अशा नृत्यप्रकारातही तो तितकाच पारंगत असून, मोठ्या आत्मियतेने तो या प्रत्येक कलेकडे पाहतो. परिणामी चाहत्यांच्या मनावरही त्याचं राज्य असल्याचं नेहमीच स्पष्ट होतं.