Vicky Kaushal, Katrina Kaif च्या लग्नाचा प्लान लीक

असं लग्न पुन्हा होणे नाही... 

Updated: Dec 2, 2021, 10:32 AM IST
Vicky Kaushal, Katrina Kaif च्या लग्नाचा प्लान लीक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  सध्या बॉलिवूडमध्ये धूम सुरु आहे ती म्हणजे सेलिब्रिटींच्या लग्नाची. आलिया रणबीरपासून ते अगदी विकी- कतरिनापर्यंत सर्वजण जीवनाच्या एका नव्या टप्प्याची सुरुवाक करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. सध्या सर्वत्र चर्चा होतेय ती एका अशा लग्नाची, जे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

हे लग्न आहे अभनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलचं. आता म्हणे या जोडीच्या लग्नाचा संपूर्ण प्लान लीक झाला आहे. (Vicky kaushal kjatrina kaif)

7 डिसेंबरपासून लग्नाच्या विविध समारंभांना सुरुवात होणार आहे. ज्यानंतर 8 तारखेला संगीत असणार आहे. त्याच दिवशी मेहंदीही पार पडणार आहे. 

9 डिसेंबरला सवाई माधोपूरमधील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये विकी- कतरिना विवाहबंधनात अडकणार आहेत. तर, 10 डिसेंबरला रिसेप्शन असल्याचं म्हटलं जात आहे. 

विवाहस्थळानजीकच जयपूर विमानतळ असल्यामुळे तिथूनच लग्नासाठीचे पाहुणे येणार आहेत. ज्यानंतर त्यांना सवाई माधोपूर येथे असणाऱ्या हेलिपॅडवर आणलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

विकी आणि कतरिना लग्नासाठी 6 डिसेंबरला या ठिकाणी येणार असल्याचं कळत आहे. 

कतरिनाच्या गाण्यांवर परफॉर्म करण्यासाठी मुंबईतील एक आघाडीचा डान्स ग्रुप मुंबईतून विवाहस्थळी गेल्याचं सांगण्यात येत आहे. 

विकी आणि कतरिना यांच्या लग्नासाठी येणारे पाहुणे आलिशान हॉटेलमध्ये थांबणार आहेत. तर, ही जोडीसुद्धा लग्नानंतर जवळपास 7 लाख रुपये एका रात्रीचं भाडं असणाऱ्या रुममध्ये थांबणार असल्याचं कळत आहे.