Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधीच कतरिनानं का धरली विकीच्या घराची वाट?

पाढऱ्या रंगाची साडी आणि साजेशा या लूकमध्ये कतरिना का गेलेली विकीच्या घरी, मोठं कारण समोर...   

Updated: Dec 6, 2021, 12:45 PM IST
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधीच कतरिनानं का धरली विकीच्या घराची वाट?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी सध्या कलाजगत आणि चाहत्यांचं वर्तुळच नव्हे, तर राजस्थानही सज्ज होत आहे. 9 डिसेंबरला ही जोडी मोठा इतिहास लाभलेल्या एका ठिकाणी विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील हे ठिकाण सध्या अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे या सेलिब्रिटी जोडीचं लग्न. 

मागील काही दिवसांपासून कतरिना आणि विकीची एक झलक मिळावी, यासाठी छायाचित्रकार एकच गर्दी करताना दिसत आहेत. (Katrina kaif Vicky kaushal )

विकी आणि कतरिना या दोघांच्याही घराबाहेर ही गर्दी आहे. अशातच रविवारी कतरिना सुंदर पांढऱ्या रंगाच्या एका फ्लेअर्ड साडीमध्ये तिच्या घरातून बाहेर पडली आणि सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. 

पाहता पाहता, कतरिना थेट विकी कौशल याच्या घरी पोहोचली. लग्नाआधीच कतरिनानं विकीच्या घरची वाट का धरली असाच प्रश्न अनेकांना पडला. 

सूत्रांच्या माहितीनुसार ती एका अतीमहत्त्वाच्या कारणासाठी तिथं पोहोचली होती. जे सर्वांच्याच भुवया उंचावत आहे. 

असं म्हटलं जात आहे की, कतरिना आणि विकीनं रविवारी त्यांच्या लग्नाची नोंदणी केली आहे. थोडक्यात त्यांनी रजिस्टर मॅरेज उरकलं आहे.

विधीवत विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच कतरिना आणि विकीनं त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ज्यामुळं चाहत्यांना आनंद झाला आहे. 

दरम्यान, एकिकडे विकी आणि कॅटच्या लग्नामुळं आनंदी वातावरण असतानाच दुसरीकडे या अभिनेत्रीच्या सासऱ्यांनी म्हणजेच शाम कौशल यांनीही सर्वांची मनं जिंकली आहेत. 

विकीच्या घराबाहेर असणाऱ्या अनेक छायाचित्रकारांसाठी त्याच्या वडिलांनी खाण्यापिण्याची सोय म्हणून स्टार्टर्स मागवले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचले. 

शाम कौशल यांचा हा निर्णय़ त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडवून गेली.