मुंबई : 'धडक', 'गुड लक', 'रुही' अशा अनेक सिनेमांतून अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) प्रेक्षकांच्या भेटीस आली. फार कमी कालावधीत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या हॉट अदांना चाहत्यांना नेहमी घायाळ करणारी जान्हवी तिच्या फिटनेसमुळे देखील सतत चर्चेत असते. जान्हवी सारखी फिट फिगर हवी असेल तर, जान्हवीचा Diet plan आणि अभिनेत्री करत असलेले वर्कआउट नक्की जाणून घ्या.
स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करते जान्हवी?
- जन्हवीला वेट ट्रेनिंग करायला फार आवडतं. वेट ट्रेनिंग केल्यामळे मसल्स टोन करण्यास मदत होईल.
- वेट ट्रेनिंग शिवाय जान्हवी योग देखील करते. ज्यामुळे शरीराची फ्लेग्झिबिलिटी वाढण्यास मदत होते.
- जेव्हा जान्हवी जीमला जात नाही तेव्हा अभिनेत्री जॉगिंग आणि स्विमिंग करते.
- जान्हवी कपूर डाएटमध्ये ताजी फळ आणि भाज्यांचा समावेश करते.
- ब्राउन राइस, अंड्याचा पांढरा भाग आणि कोशिंबीर जान्हवी दुपारच्या जेवणासाठी घेते.
- रात्रीच्या जेवणात अभिनेत्री उकडलेल्या भाज्या खाते.
सांगायचं झालं तर, जान्हवी कपूर प्रचंड फिटनेस फ्रीक आहे. अभिनेत्रीला दररोज जीममध्ये जाताना स्पॉट केलं जातं. जान्हवी कपूर इन्स्टाग्रामवर व्यायाम आणि आहाराचे फोटो-व्हिडिओ पोस्ट करत असते. एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरने तिच्या वर्कआउट रूटीन आणि फिटनेसचे रहस्य शेअर केले.