Video : सात जन्माच्या बंधनात अडकले NEHUPREET

पाहा गायिका नेहा कक्करच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण   

Updated: Oct 25, 2020, 09:53 AM IST
Video : सात जन्माच्या बंधनात अडकले NEHUPREET
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागील काही दिवसांपासून ज्या क्षणाची सर्वजण अगदी आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाच. गायिका neha kakkar नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळालं. दिल्लीतील गुरुद्वाऱ्यात सर्व विधींसह नेहा आणि रोहनप्रीतचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांचेही अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

सोशल मीडियावर या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नसोहळ्याचे काही व्हिडिओ आता चाहत्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये विवाहसोहळ्याची काही क्षण पाहताना आपणही या समारंभाचे साक्षीदार असल्याची अनुभूती होते, अशीच प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे. इतकच नव्हे, तर या जोडीवर शुभेच्छा आणि शुभाशीर्वादांचा वर्षावही केला आहे.

लग्नासाठी नेहानं सुरेख असा लेहंगा घातला होता. तर, रोहनप्रीतही साजेशा शेरवानीमध्ये तिला अगदी शोभून दिसत होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी विवाहसोहळ्यावेळी ज्या लूकला आणि पेहरावाला प्राधान्य दिलं होतं, अगदी त्याच रुपात नेहा आणि रोहनप्रीतलाही पाहायला मिळालं. 

 
 
 
 

A post shared by Classy Brides  (@desiclassybrides) on

अनेक फॅन पेजवरुन नेहाच्या या विवाहसोहळ्यातील आणि इतरही विधींदरम्यानचे फोटो आमि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. कलाविश्वात सध्या याच विवाहसोहळ्याची चर्चाही सुरु आहे. दरम्यान, साता जन्मासाठी एकमेकांना साथ देण्याची वचनं दिल्यानंतर आता या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं एका रिसेप्शन सोहळ्याचंही आजोयन करण्यात आल्याचं कळत आहे. पंजाबमध्ये हा स्वागतसोहळा पार पडेल असं म्हटलं जात आहे.