बॉलीवूड अभिनेत्री दुटप्पी, स्त्रीवादाचा सोयीस्कर वापर करतात- तनुश्री दत्ता

सध्या जगात स्त्रीवादाची चलती असल्याने अनेक नट्या स्त्रीवादी झाल्या आहेत.

Updated: Feb 15, 2020, 03:53 PM IST
बॉलीवूड अभिनेत्री दुटप्पी, स्त्रीवादाचा सोयीस्कर वापर करतात- तनुश्री दत्ता

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या दुटप्पी असल्याची जळजळीत टीका अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली. तनुश्री हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. लवकरच या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी होणार आहे. 

या पार्श्वभूमीवर तनुश्री दत्ता हिने 'नवभारत टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूड कलाकारांवर टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला पाठिंबा दिला. मात्र, केवळ ट्विट करून जग बदलत नाही. अनेक अभिनेत्रींनी सुरुवातीला ट्विट करून मला पाठिंबा दर्शविला. मात्र, काही दिवसांना त्यांच्या ओळखीच्या दिग्दर्शकाचे नाव Me Too प्रकरणात पुढे आल्यानंतर या अभिनेत्रींनी त्यांच्या पाठिशी उभे राहणे पसंत केले. 

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू- तनुश्री दत्ता

बॉलीवूडमधील हा दुटप्पीपणा मला बिलकूल लक्षात येत नाही. येथील कलाकारांचे वर्तन अत्यंत दुटप्पी आहे. सध्या जगात स्त्रीवादाची चलती असल्याने अनेक नट्या स्त्रीवादी झाल्या आहेत. मात्र, या सगळ्याजणी केवळ नावाला स्त्रीवादी आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि वर्तनात प्रचंड तफावत असते, अशी टीकाही यावेळी तनुश्री दत्ता हिने केली. 

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादावर बोलली काजोल. 'हे सत्य आहे...'

तसेच तिने नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. मी खूप कष्टाने बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. मात्र, नाना पाटेकर यांनी माझी कारकीर्द उद्ध्वस्त केली. मी कधीही कोणाची चमचेगिरी किंवा कोणाची रात्र सजवून अभिनेत्री झालेली नाही. त्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतल्याचे तनुश्री दत्ता हिने सांगितले.