मुंबई : बिपाशा बसु (Bipasaha Basu) सध्या रुपेरी पडद्यावर सक्रिय नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायमच संपर्कात आहे. बिपाशानं नेहमीच पती करण सिंग ग्रोवर याच्यासोबतच्या काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. पण, आता मात्र पतीनं तिची चांगलीच पोलखोल केल्यामुळे आता तो अडचणीतही येऊ शकतो.
हल्लीच बिपाशा आणि करणनं एका सेशनमध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिली. या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये एक वेळ अशीही आली, जिथं बिपाशा बासूबद्दल करणनं अशी पोलखोल केली की तीसुद्धा गोंधळली.
दोघांपैकी कमी वेळा अंघोळ कोण करतं? असा प्रश्न विचारला असता ज्याचं उत्तर करणनं बिपाशाच्या दिशेनं उशी फेकत केलं. त्याच्या या उत्तरानं बिपाशालाही धक्काच बसला.
बिपाशा आणि करणची केमिस्ट्री कायमच चाहत्यांची मनं जिंकत आली आहे. या साऱ्यामध्ये कायमच बिपाशाच्या पतीचं खासगी आयुष्यही कायम चर्चेचा विषय ठरलं आहे. हे करणचं तिसरं लग्न आहे.
करणनं 2008 मध्ये श्रद्धा निगम या अभिनेत्रीशी लग्न केलं होतं. अवघ्या 10 महिन्यांमध्ये त्यांचं नातं तुटलं. यानंतर 2012 मध्ये त्यानं अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्याशी लग्न केलं. पण, 2014 मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला. पुढे बिपाशाची त्याची जवळीक वाढली आणि 2016 मध्ये ते विवाहबंधनात अडकले.