Brick Making Businessman : हिमाचल प्रदेशमध्ये सिमेंटच्या विटा बनवणाऱ्या एका व्यापाराला 2 अब्ज 10 कोटी पेक्षा जास्तचं वीज बील आलं आहे. 2 अब्ज 10 कोटीचं वीज बील पाहून ललित धीमान नावाच्या या व्यापाऱ्याला मोठा धक्का बसला आहे. हे कळताच त्या व्यापारानं या संबंधीत वीज बोर्डच्या कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तपास केल्यानंतर बिलात सुधार करण्यात आली आहे.
हमीरपुर जिल्ह्यातील भोरंजी उपविभागांतर्गत येणाऱ्या बेहडविन जट्टान गावात ही घटना घडली आहे. सिमेंटच्या विटा बनवण्याचा लघु उद्योग चालवणारे ललित धीमान म्हणाले की, त्यांच्या वीज बिलात 2,10,42,08,405 ही रक्कम पाहून त्यांना धक्का बसला. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कोट्यवधी रुपयांचे बिल दिले. ते पाहून ललित धीमान यांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी वीज मंडाळाच्या कार्यालयात जाऊन त्या संबंधीत तक्रार दाखल केली.
वीज मंडळानं तपास केल्यानंतर हे समोर आलं की अब्जात बील आल्याचं कारण मशीनमध्ये काही बिघाड असण्याची शक्यता आहे. आता बिलात सुधार करण्यात आला आहे आणि व्यापाऱ्याला 4 हजार 47 रुपयांचं वीज बिल देण्यात आलं आहे. वीज मंडळानं हमीरपुर जोनच्या एसई आशीष कपूरनं सांगितलं की मीटर रीडिंग असलेले मशीनशी चुकीचं रीडिंग अपलोड होत असल्यानं इतकं बील आलं होतं.
त्यावेळी त्यांनी सांगितलं की वीज बील पुन्हा देण्यासाठी किंवा त्याचा तपास करण्यासाठी सहाय्यक अभियंता स्तरावरही ते मंजूर करणे महत्त्वाचे ठरले होते. पण हे होऊ शकलं नाही. त्यामुळे आता एसडीओला सोमवारी सगळ्या कागदपत्रांसह बोलावण्यात आलं. जेणे करून भविष्यात अशा प्रकारची कोणतीही चूक पुन्हा होणार नाही. त्यांनी म्हटलं की आता वीज बिलाला रेक्टिफाय म्हणजे तपासून आलेलं जे बील आहे ते 4 हजार 47 रुपये आहे. हे असं काही होण्याची ही पहिलीच घटना नाही तर या आधी देखील अनेकांसोबत असं काही झाल्याच्या तक्रारी समोर आल्याचे पाहायला मिळाले आहे.