ड्रिम वेडिंगसाठी दीपिकाचा लेहंगा डिझाईन करणार 'हा' डिझायनर?

दीपिका लग्नाच्या दिवशी नेमकी कोणत्या रुपात दिसणार?

Updated: Oct 23, 2018, 09:12 AM IST
ड्रिम वेडिंगसाठी दीपिकाचा लेहंगा डिझाईन करणार 'हा' डिझायनर?

मुंबई : बी- टाऊनमध्ये 'बाजीराव- मस्तानी' आणि 'राम- लीला' या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची जोडी आता आयुष्यातील एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. 

१४ आणि १५ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकणार आहेत. 

अतिशय खासगी अशा विवाहसोहळ्यात ते सहजीवनाची शपथ घेणार असून, आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे दीपिकाच्या लग्नातील खास लेहंग्याची. 

दीपिका लग्नाच्या दिवशी नेमकी कोणत्या रुपात दिसणार हेच पाहण्यासाठी आता चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे. 

दीपिकाची आतापर्यंतची आवड आणि सेलिब्रिटी डिझायरनर्सविषयी तिचा कल पाहता सब्यसाची मुखर्जी याने डिझाईन केलेला लेहंगा ती लग्नाच्या दिवसासाठी निवडेल अशा चर्चा आहेत.

काही दिवसांपूर्वी सब्यसाची आणि तिची भेटही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता डीपी खरंच 'सब्यसाची ब्राईड' होणार का, याकडेच अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

दीपिकाप्रमाणेच रणवीरही लग्नाच्या दिवशी कोणत्या रुपात दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रणवीरचा एकंदर फॅशन सेन्स पाहता लग्नाच्या दिवशी तो कोणत्या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरला पसंती देणार हे येत्या काळात कळेलच.