close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दीपिकाने घेतलं बाप्पाचं दर्शन; व्हिडिओ व्हायरल

दीपिका बाप्पाच्या चरणी नतमस्तक...

Updated: Sep 12, 2019, 10:03 AM IST
दीपिकाने घेतलं बाप्पाचं दर्शन; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : एक आठवड्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, पती रणवीर सिंहसोबत लंडनहून भारतात परतली. त्यानंतर आता बुधवारी दीपिका गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना दिसली. दीपिका बुधवारी रात्री लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहचली. 

बाप्पाच्या दर्शनासाठी दीपिका भारतीय पेहरावात आली होती. गोल्डन रंगाच्या साडीमधील दीपिकाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

deepika

deepika

deepika

दीपिकाने लालबाग राजाच्या चरणी पूजादेखील केली. 

दीपिका लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅसिड अॅटक पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. दीपिका 'छपाक'मध्ये लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. 

त्याशिवाय दीपिका पती रणवीर सिंहसोबत आगामी '८३' चित्रपटातही दिसणार आहे. '८३' चित्रपट वर्ल्ड कप १९८३ वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसेल. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे. 

कबीर खान दिग्दर्शित '८३' १० एप्रिल २०२० रोजी क्रिकेटमधील सुवर्ण अध्यायाला झळाळी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.