close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तापसीचं ठरलंय... लवकरच अडकणार विवाह बंधनात?

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कपल लग्न करण्याच्या मार्गावर आहेत.

Updated: Sep 11, 2019, 07:22 PM IST
तापसीचं ठरलंय... लवकरच अडकणार विवाह बंधनात?

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कपल लग्न करण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. 'पिंक' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे समोर येत आहे. आपल्या विवाहाचा खुलासा खुद्द तापसीने केला. एका मुलाखतीच्या माध्यमातून तिने आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य केले आहे. या मुलाखतीत तिने आपण सिंगल नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पिंकव्हिला या चॉट शो दरम्यान तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. परंतू तिने तिचा लाईफपार्टनर कोण आहे आणि तो क्षेत्रात काम करतो याबद्दल गोपनीयता बाळगली आहे. त्यामुळे तिचा पार्टनर कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

यावेळेस ती म्हणाली की, 'माझं लग्न झालेलं नाही. पण माझ्या आयुष्यात जो व्यक्ती आहे तो अभिनेता किंवा क्रिकेटर नाही.' या शोमध्ये तिची बहिण देखील तिच्या सोबत उपस्थित होती. बहिणीमुळे तापसीला तिचा जोडीदार मिळाला असल्याचे तिच्या बहिणीचे म्हणने आहे. 

जेव्हा तापसी कुटुंब नियोजन करण्यास सुरूवात करेल, तेव्हा ती लग्नासारखा महत्वाचा निर्णय घेणार आहे. शिवाय ती लग्न फक्त नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित करणार आहे. 

त्याचप्रमाणे, 'मिशन मंगल' चित्रपटाच्या यशानंतर ती 'थप्पड' चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करणार आहेत, तर हा चित्रपट पुढील वर्षी ६ मार्चला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.