बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

'तिने' इन्स्टाग्रावर बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

Updated: Dec 8, 2019, 08:33 PM IST
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

नवी दिल्ली : बॉलिवूड सुपरस्टार सध्या सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सेलिब्रिटी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करताना पाहायला मिळतात. याचदरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) इन्स्टाग्रामवर तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 

दीपिका सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिने गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या बालपणातील एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका तितकीशी ओळखूही येत नाहीये. या फोटोमध्ये दीपिका तिच्या दिव्या नारायण या मैत्रिणीसोबत दिसत आहे.  

दीपिकाने हा फोटो शेअर केल्यानंतर फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका आगामी 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत दीपिका पाहायला मिळणार आहे. 'छपाक' १० जानेवारी २०२० मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय दीपिका '८३' चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका या चित्रपटातून अभिनेता आणि पती रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.