'सन्नी दा' अडकला विवाहबंधनात

पाहा लग्नाचे खास फोटो 

Updated: Dec 8, 2019, 08:01 PM IST
'सन्नी दा' अडकला विवाहबंधनात

मुंबई : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सुरज म्हणजे राणाचा लहान भाऊ राज हंजनाळे विवाहबंधनात अडकला आहे. नुकताच राजने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. प्रेक्षकांनी सुरजला शुभेच्छा दिल्या आहेत. राजने आपल्या लग्नाचा फोटो पोस्ट करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

राणा आणि अंजलीच्या नात्यात 'दोस्तीचं प्रेम' आणि 'लग्नाचं प्रेम' हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. अगदी त्याच प्रकार राज हंचनाळे याने लग्न केलं आहे. राजची पत्नी ही हरयाणाची असल्याचं त्याच्या हॅशटॅगवरून कळतंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Grow old along with me! The best is yet to be. #RajKiMolly #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love #friends

A post shared by Raaj (@raj_hanchanale) on

राजने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणाच्या भावाची म्हणजे सन्नीदा सुरजची भूमिका साकारली आहे. मोठ्या भावावर जीवापाड प्रेम करणारा सन्नी दा सगळ्यांना भावतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#rajkimolly

A post shared by Molly (@happpy__molly) on

happy molly असं इंस्टाग्रामवर या मुलीचं नाव असून ही राजची 2013 पासूनची मैत्रिण असल्याचं त्यांच्या फोटोंवरून समजतं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I Love us  #RajkiMolly #mollykaraj #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love

A post shared by Molly (@happpy__molly) on

मराठमोळ्या पद्धतीने हा विवाह झाला असून राजची पत्नी ही जाट समाजाची आहे. हरयाणा आणि महाराष्ट्र असे दोन समाज या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. राजची पत्नी ही आर्मी वातावरणात वाढली असून तसेच ती ऍनिमेटर असून तिला योगाची आवड आहे.