Deepika Padukone : Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

95th Academy Award :"Oscar 2023" यावर्षी भारतासाठी खूप खास आहे, भारताचे तीन सिनेमे ऑस्करच्या यादीत आहेत, नातू नातू सॉंगने आधीच डंका वाजवला आहे, त्यात आता दीपिकाने जे मिळवलाय ते खरच खूप अभिमानस्पद आहे. 

Updated: Mar 3, 2023, 01:16 PM IST
Deepika Padukone :  Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा  title=

Deepika Padukone On 95th Academy Award : मस्तानी दीपिका पदुकोण (deepika padukone) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि आज टी आघाडीची अभिनेत्री म्हणून नाव कमवत आहे, बॉलिवूडचं नाही  तर हॉलिवूड मध्येही दीपिकाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.  सध्या दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, त्याच कारण आहे ऑस्कर. दीपिकाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscar 2023) भारताचे नाव आणखी उंचावलं आहे.

'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या (95th Academy Award ) यादीत दीपिका पादुकोणच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे, भारतासाठी ही नक्क्कीच अभिमानाची गोष्ट आहे. स्वतः दीपिकाने तशी पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. (Bollywood Actress Deepika padukone to attend 95th academy award as presenters with dwayne johnson michael b jordan)

यंदाचा हा 95 वा ऑस्कर सोहळा आहे. हा सोहळा होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.  'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.  (95th Academy Award ) 

सगळीकडे दीपिकाची हवा 

या आधीसुद्धा दीपिकाने अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. इतकंच काय तर कंस फिल्म फेस्टिवल मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगप्रसिद्ध फुटबॉल मॅच फिफा वर्ल्डकप (Fifa worldcup) मध्ये ट्रॉफीच अनावरणसुद्धा दीपिकाच्या हस्ते करण्यात आलं होतं.   (Deepika Padukone Oscar 2023)

यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास 

यंदाचा ऑस्कर हा भारतासाठी खूप अर्थाने खास आहे , ते म्हणजे भारताचे ३ सिनेमे यावेळी ऑस्कर साठी शर्यतीत उभे आहेत. सुपर डुपर एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर सिनेमाचा यात समावेश आहे. 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू'  (RRR natu natu song ) या गाण्याला 'ओरिजनल सॉंग' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. 'ऑल दॅट ब्रेथ्स' या डॉक्युमेंट्रीला  'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे.  तर 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या  डॉक्युमेंट्रीला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून नामनांकन मिळालं आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रण्ट विषयी बोलायचं झालं तर पठाण सिनेमाने चांगली कमाई करून जगभर धुमाकूळ घातला.  लवकरच 'फायटर' या सिनेमातून दीपिका पुन्हा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.  बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्यासोबत 'प्रोजेक्ट के' या सिनेमात ती दिसणार आहे. (Deepika Padukone :  Oscar 2023)